-
CENTRES
Progammes & Centres
Location
भारताचे नवीन MAHASAGAR व्हिजन हिंद महासागरातील धोरणात्मक सातत्य दर्शवते, ज्यामुळे व्यापार, विकास आणि सुरक्षितता स्वीकारण्यासाठी SAGAR ची व्याप्ती वाढते.
Image Source: Getty
मार्च 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या राजकीय दौऱ्यावर मॉरिशसला गेले. त्यांनी मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनानिमित्त मुख्य पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली. कालांतराने मॉरिशस भारताचा एक महत्त्वाचा धोरणात्मक (strategic) भागीदार म्हणून उदयास आला आहे. 2015 मध्ये पंतप्रधान मोदींनी SAGAR (Security and Growth for All in the Region) ही दृष्टी मांडली होती, जी आज भारताच्या हिंद महासागरावरील धोरणाचा पाया बनली आहे. 2024 च्या सुरुवातीला भारत आणि मॉरिशसने मिळून आगालेगा बेटावर (Agálega Island) एक सुधारित हवाई पट्टी उभारली आहे. हे बेट पश्चिम हिंद महासागरातील भारतीय नौदलासाठी एक महत्त्वाचं रणनीतिक ठिकाण मानलं जातं.
महासागर (MAHASAGAR) ही योजना केवळ एक सुधारणा नाही, तर दीर्घकालीन रणनीतीचा पुढचा टप्पा आहे.
हिंद महासागर क्षेत्रात भारत आणि मॉरिशस यांच्यात वाढत्या समुद्री सुरक्षाविषयक समन्वयाच्या पार्श्वभूमीवर, मार्च 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मॉरिशस दौऱ्याकडे या भागातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या संधीच्या रूपात पाहिले गेले. अपेक्षेप्रमाणे, या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी MAHASAGAR (Mutual and Holistic Advancement for Security and Growth Across Regions) ही नवीन दृष्टिकोन मांडला. आपल्या भाषणात त्यांनी व्यापार, क्षमता निर्माण, आणि सामायिक सुरक्षेवर आधारित सहकार्य वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित केले जे दीर्घकालीन शाश्वत विकास आणि सामायिक भविष्यासाठी अत्यावश्यक आहे.
महासागर (MAHASAGAR) ही योजना सागर SAGAR (Security and Growth for All in the Region) या पूर्वीच्या रणनीतीचा केवळ दर्जात्मक उन्नतीकरण नाही, तर ती त्याचीच सुसंगत आणि पुढची पायरी आहे. हिंद महासागरातील सामायिक हितसंबंधांवर भारताने जी सातत्यपूर्ण भूमिका घेतली आहे, ती महासागर (MAHASAGAR) च्या माध्यमातून अधिक व्यापक पातळीवर पोहोचवली जात आहे. अशा प्रकारे, महासागर (MAHASAGAR) कडे केवळ नवीन दृष्टीकोन म्हणून पाहणं पुरेसं ठरणार नाही, तर ती भारताच्या दीर्घकालीन, सर्वसमावेशक आणि सामरिक धोरणाची सशक्त आणि पुढची अभिव्यक्ती आहे.
इंडो-पॅसिफिकमधील शांतता आणि स्थिरता भारतासाठी अत्यावश्यक आहे, विशेषतः भारताच्या भूमिकेमुळे तो या भागातील एक महत्त्वाचा समुद्री सुरक्षा भागीदार ठरतो. मात्र, भारताची समुद्री सुरक्षा दृष्टी ही केवळ पारंपरिक सुरक्षेपुरती मर्यादित राहिलेली नाही. ती या प्रदेशातील किनारपट्टीच्या देशांना भेडसावणाऱ्या विकासात्मक अडचणींचाही विचार करते. या दृष्टिकोनातून विकासाच्या गरजा समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जातो, ज्यामुळे या भागातील देशांना भेडसावणाऱ्या गुंतागुंतीच्या समस्या अधिक चांगल्या प्रकारे हाताळता येतात. नुसती सुरक्षा पुरेशी नसून, या भागात सहकार्य वाढवण्यासाठी प्रादेशिक स्तरावरील सामूहिक विचार आणि कृती देखील तितकीच महत्त्वाची आहे. आजच्या घडीला भारतीय महासागर क्षेत्रात कुठलीही मोठी पारंपरिक नौदल युद्धस्थिती नाही. त्यामुळे येथे सुरक्षेचे केंद्र बदलले आहे. पारंपरिक सुरक्षेऐवजी आता हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तींमुळे निर्माण झालेली मदतीची गरज आणि पुनर्बांधणीवर भर दिला जात आहे. अशा मानवी मदत कार्य व आपत्ती निवारण (HADR) उपक्रमांमध्ये भारताने फार महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि तो या अजेंड्याच्या आखणीतही अग्रभागी राहिला आहे.
भारताने स्वतःला एक ‘प्राधान्य सुरक्षा भागीदार’(first responder) म्हणून मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्यामागे एक स्पष्ट उद्देश आहे आणि तो म्हणजे, पारंपरिक निव्वळ सुरक्षा पुरवठादार (‘provider of net security’) म्हणून जो एकपक्षीय किंवा ग्राहक-संरक्षक (client-patron) संबंध दिसून येतो, त्यातून बाहेर पडण्याचा हा प्रयत्न आहे.
भारतीय महासागर क्षेत्रातील एक महत्त्वाचा सुरक्षा घटक म्हणून, भारताने आता स्वतःची भूमिका ‘net security provider’ (निव्वळ सुरक्षा पुरवठादार) म्हणून मांडण्याऐवजी ‘प्राधान्य सुरक्षा भागीदार’ किंवा ‘पहिला प्रतिसादकर्ता’ (first responder) म्हणून मांडली आहे. ही धोरणात्मक स्थितीतील बदल भारताच्या या भागातील भूमिकेच्या नव्या कल्पनेशी सुसंगत आहे. या पार्श्वभूमीवर, भारत आणि चीन यांच्यात भारतीय महासागर क्षेत्रात प्रभावासाठीची स्पर्धा अधिक ठळक होत चालली आहे. भारताच्या भूमिकेचे वैशिष्ट्य त्याच्या भौगोलिक मध्यवर्ती स्थानावर आधारित आहे, तर चीन या भागातील आपला प्रभाव वाढवण्यासाठी अधिक ‘व्यवहारीक’ आणि ‘देणं-घेणं’ या दृष्टिकोनातून वाटचाल करत आहे. या दृष्टिकोनामुळे दोन्ही देशांमध्ये केवळ प्रतिस्पर्धा नव्हे, तर त्यांच्या रणनीती आणि सहभागाच्या पद्धतींमध्येही स्पष्ट फरक दिसून येतो. चीनच्या सहभागात राजकीय प्रभावविस्ताराचा स्पष्ट हेतू दिसतो, जो बहुधा आर्थिक किंवा सामरिक फायदे यावर केंद्रित असतो. याच्या उलट, भारताने स्वतःच्या भूमिकेला एक ‘सौम्य, सहकार्यशील भागीदार’ म्हणून मांडले आहे, ज्याचे अधिष्ठान सामायिक आव्हानं, परस्पर विकास आणि एकत्रित भविष्यात आहे. ही भुमिका केवळ सामरिक नव्हे, तर नैतिकदृष्ट्याही अधिक विश्वासार्ह आहे. त्यामुळे भारताचा ‘प्रथम प्रतिसादकर्ता’ (first responder) म्हणून आत्मप्रत्ययाचा दृष्टिकोन पारंपरिक ‘client-patron’ (ग्राहक-संरक्षक) साच्यातून बाहेर पडून, भागीदारीवर आधारित आणि सहभावी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा ठरतो.
महासागर (MAHASAGAR) ही संकल्पना भारताच्या महासागरीय धोरणात केवळ एक नवीन टप्पा नसून, ही एक व्यापक आणि दूरदृष्टीपूर्ण दिशा आहे जी भारताच्या दोन्ही महत्त्वाच्या आघाड्यांवरची भूमिका अधोरेखित करते. प्रथम, ही संकल्पना भारताच्या इच्छाशक्तीला अधोरेखित करते की भारताला केवळ क्षेत्रीय स्तरावर नव्हे, तर जागतिक स्तरावरही भारतीय महासागरातील समुद्री सुरक्षा आर्किटेक्चर (maritime security architecture) घडवण्यात सक्रिय भूमिका बजावायची आहे. याचा अर्थ असा की, भारत आता केवळ सुरक्षेची जबाबदारी घेणारा देश राहणार नाही, तर सहकार्य, समन्वय आणि सामूहिक सुरक्षा विचारांमध्ये मार्गदर्शक म्हणूनही पुढे येऊ इच्छितो. द्वितीय, महासागर (MAHASAGAR) ही संकल्पना ग्लोबल साउथ (Global South) म्हणजेच विकसनशील देशांशी भारताच्या सहकार्याच्या इच्छेचेही प्रतिबिंब आहे. सामायिक हितसंबंधांवर आधारित प्रश्नांवर सहकार्य वाढवणे, विकासात्मक भागीदारी आणि धोरणात्मक समन्वय ही या नव्या व्हिजनची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. म्हणूनच, महासागर (MAHASAGAR) ही भारताच्या महासागरीय सुरक्षा धोरणाची आणि ग्लोबल साउथशी असलेल्या भूमिकेची एकसंध वीण (strategic knit) आहे. ती भारताच्या महासागरीय दृष्टिकोनात सातत्य राखते, परंतु त्याला एक नव्या पातळीवर नेऊन ठेवते, जिथे सुरक्षा, विकास, आणि जागतिक सहकार्य या सगळ्या घटकांचा समावेश आहे.
भारताच्या सहकार्याच्या भौगोलिक व्याप्तीत एक नियोजित आणि टप्प्याटप्प्याने विस्तार होत असल्याचे दिसून येते, ज्याद्वारे भारत आता इंडो-पॅसिफिक प्रदेशात अधिक सक्रीय भूमिका बजावू पाहत आहे.
महासागर (MAHASAGAR) व्हिजनमधून भारताच्या बहुआयामी धोरणात्मक उद्दिष्टांचा पाठपुरावा होत असल्याचे स्पष्टपणे जाणवते. या नव्या दृष्टिकोनातून भारत तीन महत्त्वाच्या उद्दिष्टांकडे वाटचाल करत आहे. पहिलं, MAHASAGAR हे सहकार्याच्या नव्या क्षेत्रांमध्ये विशेषतः सागरी व्यापार आणि शाश्वत विकासासारख्या मुद्द्यांमध्ये विस्तार घडवून आणण्याची क्षमता ठेवतो.
दुसरं, भारताच्या सहकार्याच्या भौगोलिक व्याप्तीत एक नियोजित आणि टप्प्याटप्प्याने विस्तार होत असल्याचे दिसून येते, ज्याद्वारे भारत आता इंडो-पॅसिफिक प्रदेशात अधिक सक्रीय भूमिका बजावू पाहत आहे. तिसरं, हा एक प्रयत्न आहे सागरी सहकार्याच्या उद्दिष्टांना ‘ग्लोबल साऊथ’ च्या व्यापक विकासात्मक गरजांशी जोडण्याचा, जे भारताच्या सहकार्याला सुरक्षा आणि अर्थकारण या दोन्ही परिमाणांशी जोडतं. मात्र, या सगळ्या घडामोडी पाहता महासागर (MAHASAGAR) म्हणजे एखादा अचानक झालेली बदल नाही, तर सागर (SAGAR) या आधीच्याच व्हिजनचा नैसर्गिक आणि पुढचा टप्पा आहे. सागर (SAGAR) जिथे प्रामुख्याने सागरी सुरक्षेला आधारभूत मानत सहकार्याचे धोरणात्मक चौकट तयार करत होते, तिथे महासागर (MAHASAGAR) हे त्या आधारावर उभारलेले एक सर्वसमावेशक आणि परस्परहितावर आधारित दृष्टीकोन घेऊन येते. हा दृष्टिकोन भारताच्या दीर्घकालीन रणनीतीचा भाग आहे. जिथे भारत एका जबाबदार, विश्वासार्ह आणि सहकार्यशील भागीदाराच्या भूमिकेतून संपूर्ण क्षेत्रासाठी शांती, सुरक्षा, आणि समावेशक विकासाचे मार्ग सुचवत आहे.
सायंतन हलदर हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमधील स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्रामचे रिसर्च असिस्टंट आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Sayantan Haldar is a Research Assistant at ORF’s Strategic Studies Programme. At ORF, Sayantan’s research focuses on Maritime Studies. He is interested in questions of ...
Read More +