-
CENTRES
Progammes & Centres
Location
जनरेटिव्ह एआय निवडणूक प्रचाराचे नियमच पुन्हा लिहित आहे. अत्यंत लक्ष्यित, बहुभाषिक आणि प्रभाव टाकणाऱ्या मोहिमा तयार करत आहे, जिथे जनसंपर्क आणि मनोविकृती यांची सीमारेषा धुसर होते.
Image Source: Getty Images
जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चे निवडणूक प्रचारात एकत्रीकरण केल्यामुळे राजकीय संवाद आणि मनधरणीची संपूर्ण रचना नव्याने परिभाषित झाली आहे. AI प्रचार प्रक्रियेशी अधिक खोलवर जोडले जात असताना, त्याची भूमिका केवळ रणनीतीपुरती मर्यादित न राहता मतदारांच्या धारणा घडवण्यापर्यंत विस्तारते. डिजिटल प्लॅटफॉर्मवर मतदारांशी संवाद साधताना AI अभूतपूर्व अचूकता, व्यापकता आणि वैयक्तिकरण आणते आणि प्रचार मोहिमांच्या जनमतावर प्रभाव टाकण्याच्या पद्धतीत मोठा बदल घडवते.
जनरेटिव्ह AI च्या उदयामुळे समकालीन निवडणूक राजकारणात प्रचार मोहिमांचा मतदारांशी संवाद साधण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाले आहेत. Florian Foos (2024) यांच्या मते, जनरेटिव्ह AI आधुनिक प्रचारातील खर्च मोठ्या प्रमाणात कमी करू शकते, विशेषतः ईमेल किंवा मजकूर संदेशांसारख्या प्रचार-संदेशांचे मसुदे तयार करण्यात मदत करून. या परिवर्तनाचा एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे भाषिक आणि सांस्कृतिक अडथळे ओलांडून मतदारांशी थेट आणि गतिमान संवाद साधण्याची बहुभाषिक AI प्रणालींची क्षमता. भारतामध्ये 18 डिसेंबर 2023 रोजी सुरू झालेली भाषिणी (Bhashini) ही योजना याचे उत्तम उदाहरण आहे. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतील काशी तमिळ संगममध्ये आपल्या भाषणाचा थेट तमिळ भाषेत अनुवाद करण्यासाठी या साधनाचा वापर केला. AI-आधारित संवाद साधने प्रचारात समाविष्ट झाल्यानंतर पारंपरिक संवादाच्या पद्धतींमध्ये मोठा बदल झाला असून, व्यापक जनसंदेशांपासून मोहिमा आता अधिक वैयक्तिक, इनोव्हेटिव्ह आणि अत्यंत लक्षित डिजिटल पोहोच असलेल्या मॉडेलकडे वळत आहेत.
जनरेटिव्ह AI च्या उदयामुळे समकालीन निवडणूक राजकारणात प्रचार मोहिमांचा मतदारांशी संवाद साधण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाले आहेत.
जेव्हा प्रचारकर्त्यांना वैयक्तिक पातळीवरील संपर्क माहिती मिळते, तेंव्हा AI च्या या क्षेत्रातील विघटनकारी क्षमतेत मोठी वाढ होते. AI-संचालित मेसेजिंग साधने मोठ्या प्रमाणावर वैयक्तिकृत कंटेन्ट तयार करून पाठवू शकतात, ज्यामुळे सकारात्मक सहभागाची शक्यता वाढते, पण त्याचबरोबर मतदारांच्या गोपनीयतेवर अतिक्रमण होण्याची चिंता देखील वाढते. अलीकडील निवडणुकांमध्ये अमेरिकेतील प्रचार मोहिमांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले गेलेले AI-निर्मित निधी संकलन ईमेल, तसेच भारतात संसदीय मतदारांना अत्यंत लक्षित आवाहने करण्यासाठी वापरलेले AI-निर्मित राजकीय उमेदवारांचे व्हिडिओ, ही काही उल्लेखनीय उदाहरणे आहेत. या उदाहरणांमुळे प्रचार मोहिमा आणि मतदारांमधील गतिशील आणि डिजिटल संवाद अधिक व्यापक व परिष्कृत होत असल्याचे दिसून येते.
प्रचाराच्या संदर्भात जनरेटिव्ह AI चे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे त्याची बहुविध भूमिका ज्यामध्ये माहिती देणे, स्क्रिप्ट तयार करणे, तसेच वैयक्तिक आणि डिजिटल संवादात मदत करणे. प्रचार साहित्याचे मग ते मजकूर असो वा ध्वनी अनुवाद केल्याने विविध आणि बहुभाषिक मतदारांपर्यंत अभूतपूर्व पोहोच साधणे शक्य होते, ज्यामुळे अधिक सर्वसमावेशक संपर्क साधला जातो. याशिवाय, ब्रिटनमध्ये दारोदार प्रचारासाठी तयार केलेल्या बॉट्ससारख्या प्रशिक्षणात्मक उपक्रमांमध्येही AI चा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे पारंपरिक माध्यमे किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मच्या पलीकडील त्याची बहुगुणकता स्पष्ट होते. अमेरिकेतील यादृच्छिक नियंत्रित चाचण्यांसह (रॅन्डोमायस्ड कंट्रोल्ड ट्रायल्स) अनेक अनुभवजन्य अभ्यास दर्शवतात की, सिंपल AI चॅटबॉट्स मतदारांशी संवाद साधण्यासाठी वापरल्यास मतदानाची उपस्थिती वाढू शकते, विशेषतः जेव्हा हे संवाद माहितीपूर्ण असतात आणि मतदान प्रक्रिया किंवा महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांसंबंधी प्रत्यक्ष व्यावहारिक शंकांना उत्तरे देतात.
जनरेटिव्ह AI चे प्रचारक्षेत्रातील एकत्रीकरण अल्पकालीन अडथळ्यांपासून मुक्त नाही. यामध्ये सर्वात महत्त्वाच्या आव्हानांपैकी एक म्हणजे AI-माध्यमित संपर्काची वैधता आणि पारदर्शकता याबाबत मतदार आणि माध्यमांमध्ये असलेली शंका.
जनरेटिव्ह AI चे प्रचारक्षेत्रातील एकत्रीकरण अल्पकालीन अडथळ्यांपासून मुक्त नाही. यामध्ये सर्वात महत्त्वाच्या आव्हानांपैकी एक म्हणजे AI-माध्यमित संपर्काची वैधता आणि पारदर्शकता याबाबत मतदार आणि माध्यमांमध्ये असलेली शंका. या संशयात भर घालणारा घटक म्हणजे प्रचारकर्त्यांनी कथानकावरील नियंत्रण गमावणे आणि AI हॅलुसिनेशन (hallucination) चा धोका ज्यामध्ये जनरेटिव्ह मॉडेल्स अधिकृत संदेशापासून विचलित होऊ शकतात किंवा चुका निर्माण करू शकतात.
दीर्घकालीन दृष्टीकोनातून पाहता, जनरेटिव्ह AI वैयक्तिकृत संदेशांच्या प्रचंड प्रमाणातील विस्तारक्षमतेला नव्याने आकार देण्याचे आश्वासन देते. मतदारांना सक्रिय करण्यावर किंवा त्यांची मनधरणी करण्यावर AI चा अंतिम प्रभाव काय असेल याबाबतचे अनुभवजन्य निष्कर्ष मिश्र आहेत, परंतु हे स्पष्ट आहे की ऑटोमेशन पारंपरिकरित्या मोठ्या प्रमाणातील फॉलो-अप किंवा सातत्यपूर्ण प्रचारातील मनुष्यबळाशी संबंधित अडचणी दूर करण्याची क्षमता बाळगते. AI प्रणाली अधिक प्रगत झाल्यामुळे, प्रचार मोहिमा आणि मतदारांमधील संवादाला आधार देणे, त्याची पूर्तता करणे आणि त्यात परिवर्तन घडवणे यातील त्यांची भूमिका अधिक गूढ आणि सखोल होण्याची शक्यता आहे. हे लोकशाही, डिजिटल नीतिमत्ता आणि बहुविध समाजांतील निवडणूक निरीक्षण यांच्या भवितव्याबद्दल मूलभूत प्रश्न उपस्थित करते.
जनरेटिव्ह AI विशेषतः लार्ज लँग्वेज मॉडेल्स (LLMs) यांची उत्क्रांती, निवडणूक प्रचारातील मनधरणीच्या प्रक्रियेचे पुनर्रचना करत आहे. उदयोन्मुख पुरावे दर्शवतात की LLMs आता मनधरणी करणारे प्रचार संदेश लिहिण्यात मानवी क्षमतेइतकेच प्रभावी झाले आहेत. काही अभ्यासांनी तर हेही दाखवून दिले आहे की हे मॉडेल्स विविध प्लॅटफॉर्म आणि भाषांमध्ये प्रभावी आणि आकर्षक कंटेन्ट तयार करू शकतात. ही प्रगती स्वयंसेवक-ते-मतदार उपक्रमांच्या सर्वोत्तम पद्धतींशी सुसंगत आहे, जिथे बहुभाषिक संवाद मोहिमांना विविध समुदायांशी जोडण्यास सक्षम बनवतो.
या फायद्याचे एक उदाहरण अमेरिकेत दिसून येते, जिथे स्थानिक पातळीवरील स्पॅनिश भाषेतील आवाहने, इंग्रजी संदेशांच्या तुलनेत किंवा स्थानिक नसलेल्या स्पॅनिश वक्त्यांच्या संदेशांपेक्षा, हिस्पॅनिक मतदारांना हिस्पॅनिक उमेदवारांना समर्थन देण्यासाठी अधिक प्रभावी ठरली आहेत. यामुळे AI-संचालित कंटेन्टची भाषिक आणि सांस्कृतिक सूक्ष्मतेशी जुळून घेण्याची क्षमता स्पष्ट होते, ज्यामुळे लक्षित मनधरणीचे प्रभावीपणा वाढतो.
याशिवाय, जनरेटिव्ह AI द्वारे स्वयंचलितपणे तयार होणाऱ्या सानुकूलित ऑडिओ-व्हिज्युअल कंटेन्टमुळे सोशल मीडिया आणि पीअर-टू-पीअर मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर अत्यंत लक्ष्यित प्रचार साहित्याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार शक्य झाला आहे. अनेक प्रमुख प्रचार मोहिमा या क्षमतांचा वापर करून डेटानिर्देशित, विस्तारक्षम आणि प्रभावी प्रचार मॉडेल्स तयार करत आहेत. यासोबतच AI चे एक प्रमुख वैशिष्ट्य हे की मोठ्या प्रमाणावर पुनरावृत्तीपूर्ण फॉलो-अप जे मतदारांशी विश्वासाधारित, दीर्घकालीन नाते निर्माण करण्यास मदत करते. यामुळे आत्मीयता आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक संबंध अधिक दृढ होतात. जनरेटिव्ह AI अधिक प्रगत होत असताना, निवडणूक प्रणालीतील त्याची प्रभावी भूमिका अधिक वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे लोकशाही सहभाग आणि निवडणूक प्रामाणिकतेसमोरील संधी आणि आव्हाने दोन्ही निर्माण होतात.
जनरेटिव्ह AI च्या प्रसारामुळे राजकीय संवादाच्या स्वरूपात मूलभूत बदल झाला आहे, विशेषतः बॉटनेट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कृत्रिम ओळख निर्माण करण्याच्या प्रक्रियेत. बॉटनेट्स जे स्वयंचलित खात्यांच्या जाळ्यांपासून (ऑटोमेटेड अकाउंट्स नेटवर्क) बनलेले असतात. ते सोशल प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर पोस्ट करणे, लाईक करणे, शेअर करणे आणि कमेंट करणे यासाठी वापरले जातात. या AI-सक्षम नेटवर्क्सची भूमिका अनेकांगी आहे: ते दिशाभूल करणारी माहिती पसरवणे, विभाजनकारी किंवा ध्रुवीकरण करणारी कंटेन्ट वाढवणे, वैध चर्चेला दाबणे आणि विशिष्ट विचारसरणींना व्यापक समर्थन किंवा विरोध असल्याचा कृत्रिम आभास निर्माण करणे यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. या क्रियाकलापांमुळे सार्वजनिक चर्चेचे विकृतीकरण होते आणि लोकशाही प्रक्रियेच्या प्रामाणिकतेस गंभीर धोका निर्माण होतो.
आधुनिक AI प्रगतीमुळे बॉट्सचे वर्तन अधिक मानवीसदृश झाले आहे, ज्यामुळे त्यांना ओळखणे आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून हटवणे अत्यंत कठीण झाले आहे. जनरेटिव्ह मॉडेल्सची प्रगतता मानवी संवाद पद्धती आणि भावनिक संकेतांची हुबेहुब नक्कल करण्यास सक्षम झाली आहे, ज्यामुळे पारंपरिक शोध पद्धती बर्याचदा निष्प्रभ ठरतात.
आधुनिक AI प्रगतीमुळे बॉट्सचे वर्तन अधिक मानवीसदृश झाले आहे, ज्यामुळे त्यांना ओळखणे आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून हटवणे अत्यंत कठीण झाले आहे.
या संबंधित घटना म्हणजे कृत्रिम ओळखी किंवा बनावट खाती निर्माण करणे, जी जनरेटिव्ह AI च्या मदतीने अत्यंत विश्वासार्ह पद्धतीने तयार केली जातात आणि अनेकदा छायाचित्रे व जीवनपरिचयासह पूर्ण, वास्तविक भासणारे प्रोफाइल्स समाविष्ट करतात. अशा कृत्रिम व्यक्तिमत्त्वांना डिजिटल समुदायांमध्ये घुसखोरी करणे, चुकीची माहिती पसरवणे आणि राजकीय प्रतिस्पर्ध्यांबद्दल माहिती गोळा करणे शक्य होते, ज्यामुळे ती निवडणूक राजकारणात आक्रमक आणि संरक्षणात्मक दोन्ही भूमिका बजावू शकतात. अशा प्रकारच्या क्रियाकलापांचा शोध घेणे आणि त्यांना आळा घालणे आता अधिक प्रगत शोध तंत्रज्ञान आणि मजबूत प्रतिकारयोजना मागते, कारण AI-निर्मित हस्तक्षेपाच्या वाढत्या प्रसारामुळे डिजिटल संवादाची प्रामाणिकता टिकवणे अधिक गुंतागुंतीचे बनत आहे. या तंत्रांच्या सातत्याने होणारी उत्क्रांती समकालीन लोकशाहींच्या समावेशकता आणि प्रामाणिकतेसमोरील एक गंभीर आणि तातडीचे आव्हान उभे करते.
2016 मधील अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर अशा सोशल बॉट्सचा वापर झाला, ज्यांनी खऱ्या सोशल मीडिया प्रोफाइल्सची नक्कल करून ऑनलाइन राजकीय चर्चेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. या स्वयंचलित खात्यांनी ध्रुवीकरण करणारी कंटेन्ट मोठ्या प्रमाणावर पसरवली, ट्रेंडिंग विषयांमध्ये फेरफार केली आणि व्यापक समर्थन किंवा विरोध असल्याचा भास निर्माण केला. खऱ्या वापरकर्त्यांमध्ये मिसळून या सामाजिक बॉट्सनी सार्वजनिक चर्चेचे विकृतीकरण केले, मतदारांच्या धारणा घडवल्या आणि डिजिटल संवादात गुंतवलेल्या गोपनीय आणि समन्वित हालचालींमधून निवडणूक निकालांवरही प्रभाव पाडला असण्याची शक्यता निर्माण केली.
निवडणूक प्रचारामध्ये जनरेटिव्ह AI च्या वापराचे नियमन आणि त्यावर देखरेख ठेवणे हे आजच्या लोकशाही समाजासमोरील प्रमुख आव्हानांपैकी एक बनले आहे. धोरणकर्ते, तंत्रज्ञ आणि नागरी समाज यांच्यातील सहकार्य आवश्यक आहे; अशा बहुउपयोगी उपक्रमांद्वारे सर्वोत्तम पद्धती विकसित करणे आणि AI च्या नैतिक वापरासाठी सामायिक मानके निश्चित करणे शक्य होते. आंतरराष्ट्रीय सहकार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. माहितीची देवाणघेवाण, समन्वित प्रतिसाद, आणि AI-संचालित हस्तक्षेपांमुळे उद्भवणाऱ्या नवीन धोक्यांना तोंड देण्यासाठी सामूहिक प्रयत्न यांची आवश्यकता आहे.
नैतिक AI विकासामध्ये न्याय, उत्तरदायित्व आणि पारदर्शकता या तत्त्वांना प्राधान्य दिले पाहिजे. यासाठी व्यापक जोखीम मूल्यांकन, पूर्वग्रह कमी करण्याच्या योजना आणि सर्वसमावेशक डिझाइन पद्धतींचा अवलंब आवश्यक आहे, ज्यामुळे विश्वास निर्माण होतो आणि प्रभावी नियमनासाठी मदत मिळते. समजण्यास सोप्या AI प्रणाली पारदर्शकता वाढवतात आणि निवडणूक प्रक्रियांवरील सार्वजनिक विश्वास दृढ करतात. तांत्रिक प्रगतीसोबतच कायदे आणि धोरणात्मक चौकटही विकसित होणे आवश्यक आहे. डेटा संरक्षण, सायबर सुरक्षा आणि AI-संबंधित वापरांसाठीचे नियम युरोपियन युनियनमधील GDPR सारख्या धोरणांचा आदर्श समोर ठेवतात.
सरकारे आणि आंतरराष्ट्रीय संस्था यांनी राजकीय संदर्भात AI च्या वापराबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणि मानके निश्चित करणे आवश्यक आहे, विशेषतः स्वायत्तता, तांत्रिक स्थिरता, गोपनीयता आणि उत्तरदायित्व यांसारख्या तत्त्वांवर भर देत.
सरकारे आणि आंतरराष्ट्रीय संस्था यांनी राजकीय संदर्भात AI च्या वापराबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणि मानके निश्चित करणे आवश्यक आहे, विशेषतः स्वायत्तता, तांत्रिक स्थिरता, गोपनीयता आणि उत्तरदायित्व यांसारख्या तत्त्वांवर भर देत. उदाहरणार्थ, EU एथिक्स गाईडलाइन्स फॉर ट्रस्टवर्दी AI या मूलभूत तत्त्वांसाठी मानदंड ठरवतात. तथापि, वास्तविक आणि कृत्रिम कंटेन्ट यांमध्ये भेद करण्याचे आव्हान अद्याप कायम आहे. डिजिटल वॉटरमार्किंग, फॉरेन्सिक विश्लेषण तंत्रे आणि AI-आधारित शोध प्रणालींसारख्या तांत्रिक उपाययोजना बॉटनेट्स आणि बनावट खात्यांच्या स्वयंचलित वर्तनाचा शोध घेणे आणि त्याचा परिणाम कमी करणे यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
सार्वजनिक जागरूकता आणि शिक्षण अत्यावश्यक आहेत; नागरिकांनी डीपफेक ओळखणे, बॉटची लक्षणे ओळखणे आणि बातमीच्या स्रोतांची विश्वसनीयता तपासणे यात प्रवीण असणे गरजेचे आहे, ज्यामुळे AI-सक्षम हस्तक्षेपांना प्रभावीपणे प्रतिसाद देता येईल. अखेरीस, जलदगतीने बदलणाऱ्या AI पर्यावरणाचा सामना करण्यासाठी मजबूत उत्तरदायित्व यंत्रणा आणि लवचिक कायद्याची चौकट आवश्यक आहे, ज्यामुळे निवडणूक प्रचारातील प्रामाणिकता सुनिश्चित होऊ शकेल.
प्रणय जैनेंद्रन हे ऑब्सरवर रिसर्च फाउंडेशनच्या सेंटर फॉर सेक्युरिटी, स्ट्रॅटेजी अँड टेक्नॉलॉजीमध्ये रिसर्च असिस्टंट आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Pranoy Jainendran is a Research Assistant with ORF’s Centre for Security, Strategy & Technology. His work examines how technology shapes State institutions, national and international affairs, ...
Read More +