इराण युद्धामुळे निर्माण झालेला हेलियमचा तुटवडा आणि जागतिक स्तरावरची मेमरी चिपची टंचाई यामुळे सेमीकंडक्टरच्या पुरवठा साखळ्यांमध्ये विविधता आणण्याची गरज निर्माण झाली आहे.
कोविड- 19 महामारीमुळे सेमीकंडक्टरच्या जागतिक पुरवठा साखळीचे गुंतागुंतीचे आणि नाजूक स्वरूप उघड झाले. यामुळे सामर्थ्यवान देशांनी त्यांच्या तंत्रज्ञान विकास धोरणांचे पुनर्मूल्यांकन केले आणि तांत्रिक व पुरवठा साखळीच्या सार्वभौमत्वाचा मुद्दा पुढे आणला. आता पुरवठा साखळ्यांची पुनर्रचना करण्याच्या जागतिक प्रयत्नांमध्ये इराण युद्धामुळे आणखी एक संकट निर्माण झाले आहे. या संघर्षामुळे सेमीकंडक्टर उत्पादनाचा कणा असलेला हेलियमचा तुटवडा आणखी वाढणार आहे. AI डेटा सेंटरच्या वाढत्या मागणीमुळे मेमरी चिप्सचा आधीच तुटवडा आहे. त्यात आता ही समस्या निर्माण झाली आहे. प्रत्येक घटक हा स्वतंत्रपणे चिंतेचे कारण असला तरी त्यांच्या एकत्रित तुटवड्यामुळे नजीकच्या भविष्यात सेमीकंडक्टर आणि तंत्रज्ञान पुरवठा साखळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे या पुरवठा साखळ्या मजबूत आणि वैविध्यपूर्ण करण्यावर भर द्यावा लागणार आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे आणि कतार एनर्जीच्या रास लाफान इंडस्ट्रियल सिटीवर झालेल्या इराणी हल्ल्यांमुळे आधीच मोठा प्रश्न आहे. कतार हे जगातले सर्वात मोठे एलएनजी निर्यात केंद्र आहे. त्यावरच हल्ले झाल्याने उत्पादन आणि जहाजवाहतूक थांबली आहे. यामुळे पुढे हेलियमचा पुरवठा कमी होऊ शकतो.
सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन हेलियमवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. यामुळेच सेमीकंडक्टर उद्योग हा हेलियम वायूचा सर्वात मोठा ग्राहक आहे. हेलियम हा मोठ्या प्रमाणावर द्रवीकृत नैसर्गिक वायू (एलएनजी) प्रकल्पांमध्ये टाकाऊ वायू म्हणून मिळवला जातो. कतार तीन प्रकल्पांद्वारे जागतिक पुरवठ्यापैकी सुमारे 34 टक्के पुरवठा करतो. त्यापैकी दोन प्रकल्प एलएनजीच्या उप-उत्पादनांचा वापर करतात. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे आणि कतार एनर्जीच्या रास लाफान इंडस्ट्रियल सिटीवर झालेल्या इराणी हल्ल्यांमुळे आधीच मोठा प्रश्न आहे. कतार हे जगातले सर्वात मोठे एलएनजी निर्यात केंद्र आहे. त्यावरच हल्ले झाल्याने उत्पादन आणि जहाजवाहतूक थांबली आहे. यामुळे पुढे हेलियमचा पुरवठा कमी होऊ शकतो.
आकृती 1: जागतिक स्तरावरचे हेलियमचे उत्पादन 2025 (दशलक्ष क्युबिक मीटर्स)

स्रोत: रॉयटर्स
हेलियमच्या किंमती आधीच वाढलेल्या असल्या तरी ही मात्र चिंतेची बाब नाही. कारण हा उद्योग मोठ्या प्रमाणावर दीर्घकालीन करारांवर चालतो. शिवाय मागच्या वर्षांतला अतिरिक्त पुरवठा असल्याने लगेच तुटवडा जाणवलेला नाही. तथापि आता मात्र पुरवठादारांना त्यांच्या करारबद्ध ग्राहकांना 'फोर्स मॅज्यूर' (अपरिहार्य परिस्थिती) घोषित करण्यास भाग पडण्याची शक्यता आहे. हे सेमीकंडक्टर उत्पादकांसाठी चिंतेचे आहे. त्यातही तैवान आणि दक्षिण कोरियाला याची जास्त चिंता जाणवते आहे. कारण हे दोन्ही देश हेलियमचा बहुतांश पुरवठा गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) देशांकडूनच मिळवतात.
मेमरी चिप्स हा सेमीकंडक्टरच्या सर्वात महत्त्वाच्या प्रकारांपैकी एक आहे. मेमरी चिप्स या आधुनिक डिजिटल आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्सचा आधारस्तंभ आहेत. तथापि अनेक दशकांपासून चालत आलेल्या पुरवठा साखळी मॉडेलमुळे मेमरी चिपचे उत्पादन प्रामुख्याने तीन कंपन्यांमध्ये केंद्रित झाले आहे. दक्षिण कोरियाची सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स आणि एसके हायनिक्स आणि अमेरिकेतील मायक्रॉन टेक्नॉलॉजी. या कंपन्यांचा डायनॅमिक रँडम-अॅक्सेस मेमरी (DRAM) बाजारात 90 टक्क्यांहून जास्त वाटा आहे.
आकृती 2 : महसुलानुसार DRAM बाजारातील वाटा

स्रोत: रॉयटर्स
जागतिक हायपरस्केलर AI डेटा सेंटर्समुळे हाय-बँडविड्थ मेमरीची (HBM) मागणी झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे सर्व प्रमुख मेमरी चिप उत्पादकांनी हळूहळू आपले उत्पादन HBM कडे वळवले आहे. असे असले तरी गुंतागुंतीच्या उत्पादन प्रक्रियेमुळे HBM चिप्सचे उत्पादनाचे प्रमाण DRAM पेक्षा कमी आहे आणि त्याचा विस्तार DRAM उत्पादन क्षमता आणि कार्यक्षमतेच्या किंमतीवर झाला आहे. या बदलामुळे स्मार्टफोन आणि संगणकासारख्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्समध्ये वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक मेमरी चिप्सच्या पुरवठा साखळीत अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी गेल्या वर्षभरात DRAM चा साठा कमी झाला आहे. सोबतच त्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
आकृती 3 : DRAM पुरवठादारांच्या साठा पातळीत घट

स्रोत : रॉयटर्स
त्याशिवाय, हा तुटवडा एक व्यापक मॅक्रो-इकॉनॉमिक (macroeconomic) जोखीम निर्माण करत आहे: यामुळे 'एआय हायपरस्केलर्स' (AI hyperscalers) कडून डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये गुंतवल्या जाणाऱ्या अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीला खीळ बसण्याची भीती आहे. सॅमसंग आणि एसके हायनिक्स या दोन्ही कंपन्यांनी मेमरी चिपची क्षमता वाढवण्यासाठी गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले असले तरी, एसके हायनिक्सने असे संकेत दिले आहेत की हा तुटवडा किमान 2027 पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
यातला प्रत्येक घटक स्वतंत्रपणे चिंतेचे कारण असला तरी त्यांच्या एकत्रित परिणामामुळे नजीकच्या भविष्यात तंत्रज्ञान पुरवठा साखळी आणि देशांच्या अर्थव्यवस्थांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. याचे एक उदाहरण दक्षिण कोरियामध्ये आत्ताच दिसून येते आहे. तिथे 4 मार्च 2026 ला शेअर बाजारात 12 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. ती इतिहासातली सर्वात मोठी घसरण होती.
येत्या काही महिन्यांत हेलियमच्या तुटवड्याची परिस्थिती आणखी चिघळू शकते. त्यामुळे जागतिक स्तरावर मेमरी चिप्सच्या पुरवठ्यात आणखी मोठी तूट निर्माण होण्याची शक्यता आहे.
येत्या काही महिन्यांत हेलियमचा तुटवडा आणखी वाढू शकतो. त्यामुळे जागतिक स्तरावर मेमरी चिप्सच्या पुरवठ्यात मोठी टंचाई निर्माण होऊ शकते. सेमीकंडक्टर उत्पादनासह दक्षिण कोरियाचा उद्योग जीवाश्म इंधनावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. तिथे 70 टक्क्यांहून अधिक कच्चे तेल मध्यपूर्वेतून, प्रामुख्याने होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे आयात केले जाते. सॅमसंग आणि एसके हायनिक्स यांचा एकत्रितपणे एचबीएम (HBM) बाजारात 80 टक्के आणि डीरॅम (DRAM) बाजारात 70 टक्के वाटा असल्याने या व्यत्ययांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठे परिणाम होऊ शकतात. AI हायपरस्केलर्सकडून होणारी वाढती गुंतवणूक आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्सची सातत्याने वाढणारी मागणी यामुळे हा धोका अधिकच वाढतो. येत्या काही महिन्यांत हेलियमच्या तुटवड्याची परिस्थिती आणखी चिघळू शकते. त्यामुळे जागतिक स्तरावर मेमरी चिप्सच्या पुरवठ्यात आणखी मोठी तूट निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोविड- 19 महामारीमुळे निर्माण झालेल्या तुटवड्यामुळे सेमीकंडक्टर पुरवठा साखळ्यांमध्ये विविधता आणण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न सुरू झाले. असे असले तरी हे प्रयत्न जागतिकीकरणामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परस्परावलंबनानंतर चार दशकांनी होत आहेत. त्यामुळे हे उपक्रम पूर्णपणे प्रत्यक्षात येण्यासाठी बराच काळ लागण्याची शक्यता आहे. या संक्रमणाच्या काळात तांत्रिक नवकल्पनांच्या वेगाने वाढणाऱ्या मागणीमुळे किंवा महत्त्वाच्या व्यापारी मार्गांमध्ये व्यत्यय आणणाऱ्या मोठ्या प्रादेशिक संघर्षांमुळे निर्माण होणारे पुरवठा साखळीतील धक्के पचवण्यासाठी हा उद्योग अजूनही तेवढा सज्ज नाही.
यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अल्पावधीतच समस्या निर्माण होते आहे. पण त्याचवेळी पुरवठा साखळीच्या विविधतेची गरज निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भारतासारख्या उदयोन्मुख उत्पादन केंद्रांवर नवी जबाबदारी येते. भारताने अलीकडेच मायक्रॉनच्या भागीदारीत आपल्या पहिल्या असेंब्ली, टेस्ट, मार्किंग आणि पॅकेजिंग (ATMP) सुविधेचे उद्घाटन केले आहे.
जागतिक सेमीकंडक्टर पुरवठा साखळी जसजशी विकसित होते आहे तसतसे हे नवीन स्पर्धक भविष्यातील धक्के आणि व्यत्ययांपासून बाजारपेठा स्थिर ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. या उद्योगावर नफा-केंद्रित ऑफशोरिंग मॉडेलचाही मोठा परिणाम झाला आहे. हे पाहता भविष्यातील तंत्रज्ञान पुरवठा साखळ्या तयार करताना एक महत्त्वाचा इशारा म्हणून या परिस्थितीकडे पाहायला हवे.
प्रतीक त्रिपाठी हे ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमधील सेंटर फॉर सिक्युरिटी, स्ट्रॅटेजी अँड टेक्नॉलॉजी (CSST) मध्ये असोसिएट फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Prateek Tripathi is an Associate Fellow at the Centre for Security, Strategy and Technology. His work focuses on an emerging technologies and deep tech including quantum ...
Read More +