Author : Pulkit Athavle

Expert Speak Young Voices
Published on Jul 06, 2024 Updated 0 Hours ago

मुलांचे बायोमेट्रिक्स कॅप्चर केल्याने असुरक्षित लोकसंख्येतील मुलांना आरोग्यसेवा अधिकाधिक उपलब्ध करून सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज प्राप्त करण्यात मदत होईल.

अर्ली चाइल्डहुड बायोमेट्रिक्स: हेल्थकेअर सुधारण्याचे एक साधन

आधार प्रणालीला आधारभूत ठरणारे बायोमेट्रिक्स भारतातील ओळख पडताळणीचे मूलभूत साधन बनले आहे, ज्यामुळे त्याचा अवलंब सरकारद्वारे आरोग्य सेवांच्या वितरणात वाढत्या प्रमाणात केला जात आहे. मात्र, बालपणात बोटांचे ठसे अचूकपणे शोधणे हे एक मोठे आव्हान असल्यामुळे बायोमेट्रिक प्रणाली अद्याप ५ वर्षांखालील मुलांना लागू केली गेलेली नाही. (हा मुद्दा एकदा विचारात घेतला गेला होता). तरीही, अलीकडची तांत्रिक प्रगती लक्षात घेता, भारताने आता आरोग्य सेवा उपलब्ध करण्याकरता सहाय्यकारी ठरेल, म्हणून बाल वयाकरता (वयोवर्ष १- ५) बायोमेट्रिक्सचा सक्रियपणे विचार करायला हवा, विशेषत: ज्यांना कमी सेवा उपलब्ध आहेत, अशांसाठी याचा प्राधान्याने विचार करायला हवा.

ओळखीचे स्थिर मार्कर म्हणून बोटांचे ठसे

असे निदर्शनास आले आहे की, लहान मुलांचे बोटांचे ठसे, अगदी नवजात मुलांचे ठसेही प्रौढ वयातील त्यांच्या बोटांच्या ठशांपासून फारसे वेगळे नसतात. जरी तीव्र शारीरिक श्रम (तात्पुरते) पॅटर्न नष्ट करू शकत असले आणि खोल, कायमचे व्रण त्यात व्यत्यय आणू शकत असले, तरी त्वचेच्या बाह्य स्तराला झालेली वरवरची इजा फिंगरप्रिंट पॅटर्न बदलू शकत नाही. परिणामी, लहान मुलांचे आणि नवजात मुलांचे फिंगरप्रिंट्स घेणे हे मोठ्या प्रमाणावर संशोधन करण्यात आलेले क्षेत्र आहे, कारण ते ओळखीचे स्थिर चिन्हक ठरू शकते, विशेषत: विकसनशील देशांमध्ये- जिथे व्यक्तींना ओळख पटवण्याच्या इतर प्रकारच्या दस्तावेजांची वानवा भासू शकते.

लहान मुलांच्या बोटांचे ठसे घेण्यातील अडथळे

तरीही, प्रत्यक्ष व्यवहारात मात्र, तंत्रज्ञानाची वानवा आणि अर्भकांचे वर्तन या समस्यांमुळे ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे फिंगरप्रिंट्स मिळवणे हे एक मोठे आव्हान आहे.

सर्वप्रथम, लहान मुलांच्या बोटांच्या ठशांचे मूळ नमुने कालांतराने बदलत नसले तरी, इमेजिंगच्या दृष्टीतून, त्यात मोठे बदल दिसून येतात. प्रत्येक फिंगरप्रिंटमध्ये हा अनोखा पॅटर्न तयार करणाऱ्या गडद रेषा आणि त्या खालच्या स्तरांतील रेषा यांचा समावेश असतो. मूल जसजसे मोठे होते, तसतशी गडद रेषांमधील अवकाश एकसमानपणे वाढतो, ज्यामुळे नवीन फिंगरप्रिंट पॅटर्न हा रेकॉर्ड केलेल्या मूळ पॅटर्नशी जुळणे तंत्रज्ञानाला कठीण होऊन बसते. जन्मानंतरच्या काही आठवड्यात नवजात मुलांच्या त्वचेचा वरचा स्तर निघून जातो, यामुळे हे आव्हान अधिक वाढते.

दुसरे असे की, सध्या सामान्यत: प्रौढ व्यक्तीकरता ‘प्लेटन’ (काचेचा पृष्ठभाग- ज्यावर बोटे दाबली जातात) हे फिंगरप्रिंट ओळखण्याचे तंत्रज्ञान वापरले जाते. लहान मुलांसाठी हे समस्याप्रधान आहे, कारण कठोर काचेच्या पृष्ठभागावर बोटे दाबल्याने त्यांची मऊ, नाजूक त्वचा आणि ज्यावर नीट रेषा अथवा पॅटर्न उमटलेले नसल्याने काही नमुने अस्पष्ट होऊ शकतात.

अखेरीस, लहान मुलांचे वर्तन लक्षात घेतल्यास, लहान मुलाला त्यांचे बोट प्लेटवर पुरेसे लांब ठेवणे, योग्य पद्धतीने ठेवणे आणि पुरेसा दाब देत वापरता येईल असा फिंगरप्रिंट स्कॅन मिळवणे हे एक आव्हान असू शकते. अहवालानुसार, नवजात बालकांच्या ज्या यांत्रिक हालचाली होतात, ज्यावर त्यांचे नियंत्रण नसते, (यात त्यांचा ज्या वस्तूंशी संपर्क येतो, त्या वस्तू नवजात बालक बोटांची हालचाल करत स्पर्शाने जाणून घेतात), ज्यामुळे प्लेटवर दिसणारा नमुना अधिकच विचित्र दिसतो.

बालवयाकरता फिंगरप्रिंट तंत्रज्ञान: मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेत उपलब्ध होत आहे

परिणामी, गेल्या काही वर्षांत, विशेषत: पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांकरता, बालवयातील बोटांचे ठसे अचूकपणे मिळवू शकणाऱ्या प्रणालींत बरेच तांत्रिक नाविन्य आले आहे. उदाहरणार्थ, लहान मुलांसाठी खूप उच्च रिझोल्यूशन स्कॅनर (>१००० पीपीआय तर प्रौढांकरता ५०० पीपीआय) वापरणे आवश्यक आहे, कारण प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांचे फिंगरप्रिंट्स लहान आणि तितकेसे ठीक नसतात. हे काही वेळा सॉफ्टवेअरसह वापरले जाते, सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रिंट नीट उमटली नसेल तर त्यात सुधारणा केली जाते. (उदाहरणार्थ प्रिंट पुसट असणे किंवा बोटांची स्थिती अयोग्य असणे)

पर्यायाने, 'प्लेटन'-संबंधित ज्या समस्या उद्भवतात, त्यांना सामोरे जाण्याकरता, उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘नॉन कॉन्टॅक्ट इमेजिंग’चा वापर करण्याचा प्रयत्न केला जातो, ज्याद्वारे फिंगरप्रिंटची प्रतिमा घन पृष्ठभागावर दाब दिल्याखेरीज मिळवता येऊ शकते. या पद्धतींनी संशोधनातील भौतिक, सामाजिक आणि प्रायोगिक संदर्भांत दर्शवले आहे की, बालवयातील फिंगरप्रिंटची अचूक ओळख सध्याच्या नवतंत्रज्ञानाने साध्य करता येते.

पर्यायाने, 'प्लेटन'-संबंधित ज्या समस्या उद्भवतात, त्यांना सामोरे जाण्याकरता, उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘नॉन कॉन्टॅक्ट इमेजिंग’चा वापर करण्याचा प्रयत्न केला जातो, ज्याद्वारे फिंगरप्रिंटची प्रतिमा घन पृष्ठभागावर दाब दिल्याखेरीज मिळवता येऊ शकते. 

अलीकडेच, जपानी कॉर्पोरेशन एनइसी (NEC), ब्रिटीश स्टार्टअप (सिम्प्रिंट्स) आणि गावी (GAVI) यांनी संयुक्त विद्यमाने एक प्रणाली विकसित केली आहे, ज्यात ९९ टक्के अचूकतेसह सॉफ्टवेअर करेक्शनसह उच्च-रिझोल्यूशन फिंगरप्रिंट स्कॅनर वापरता येतो. सप्टेंबर २०२२ मध्ये, बांगलादेशातील ४ हजार मुलांसाठी (१-५ वयोगटातील) चाचणी सुरू करण्यात आली. मोठ्या विकास संस्था आता चाचण्या सुरू करत आहेत, ही वस्तुस्थिती हा एक पक्का संकेत असावा की, हे तंत्रज्ञान आता परिपक्व होऊ लागले आहे (खर्च संभाव्यतः कमी होत आहे) आणि यातून धोरणकर्ते पुनर्विचार करण्यास प्रेरित होतील.

बाल आधार आणि आरोग्य सेवा वितरण

भारताच्या संदर्भात, बाल आधार (अल्पवयीन मुलांसाठी आधार) अंतर्गत, सध्या वयाच्या पाचव्या वर्षी बोटांच्या ठशांची नोंदणी अनिवार्य आहे आणि त्यानंतर वयाच्या १५ व्या वर्षी ही नोंदणी अपडेट करणे आवश्यक आहे. एकतर विद्यमान तंत्रज्ञानाचा परवाना देऊन (जसे की ‘गावी’द्वारे) अथवा भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांसह भागीदारीद्वारे देशात विकसित करत, सरकारने आता सहा महिन्यांच्या अथवा एक वर्षांहून मोठ्या मुलांसाठी बायोमेट्रिक्स सुरू करण्याचा सक्रियपणे विचार केला जाण्याची वेळ आली आहे. यामुळे केवळ आधार बायोमेट्रिक योजना ओळख पडताळणीत आघाडीवर राहील असे नाही, तर त्याचबरोबर आरोग्य सेवा वितरणातही ‘आधार’चे मोठे फायदे आहेत.

एकतर विद्यमान तंत्रज्ञानाचा परवाना देऊन (जसे की ‘गावी’द्वारे) अथवा भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांसह भागीदारीद्वारे देशात विकसित करून, सरकारने आता सहा महिन्यांच्या अथवा एक वर्षांहून मोठ्या मुलांसाठी बायोमेट्रिक्स सुरू करण्याचा सक्रियपणे विचार केला जाण्याची वेळ आली आहे.

सध्या, भारतातील आरोग्याच्या पायाभूत सुविधा (अनेक देशांसारख्याच) अत्यंत विकेंद्रित आहेत: एखाद्या रुग्णाच्या आरोग्यसेवेचे रेकॉर्ड्स वेगळ्या ठिकाणी उपचार घेतल्यास हस्तांतरित केले जात नाहीत. परिणामी, भारतातील ~६०० दशलक्ष अंतर्गत स्थलांतरित, ज्यात गरीब, ग्रामीण पार्श्वभूमीतील बरेच लोक जे कामाकरता शहरी/ औद्योगिक/ कृषी केंद्रांत गेले आहेत, त्यांच्या मुलांच्या कागदी नोंदी अनेकदा हरवल्या जाऊ शकतात, खराब होऊ शकतात किंवा अपूर्ण राहू शकतात.

याशिवाय, पालक अथवा मुलांची काळजी घेणाऱ्यांकडे त्यांच्या मुलाचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास (मागील चाचण्या, निदान, प्रिस्क्रिप्शन्स) सुस्पष्ट होण्याकरता वैद्यकीय साक्षरता असेलच, असे नाही, ज्यामुळे वैद्यकीय व्यवस्थापनात अडथळा येतो. उदाहरणार्थ, २०२२ मध्ये मुंबई व ठाण्यात गोवरचा उद्रेक झाला, ज्याचा प्रामुख्याने शहरांतील गरीब आणि स्थलांतरित लोकसंख्येवर परिणाम झाला, पालकांनी लसीकरणाच्या कागदी नोंदी गमावल्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांना ज्या मुलांनी डोस घेतलेले नाहीत अथवा ज्या मुलांचे डोस चुकले आहेत, अशी मुले हुडकण्यात मोठ्या प्रमाणात अडथळा आला. एका अभ्यासानुसार असा अंदाज आहे की ~ पाच वर्षांखालील ७५ टक्के प्रकरणांमध्ये लसीकरण कार्ड उपलब्ध नव्हते.

यापैकी काही समस्या यू-विन पोर्टलच्या अपडेट्स देणाऱ्या तंत्राद्वारे काही प्रमाणात सोडवल्या जाऊ शकतात, ज्याचा उद्देश सर्व यूआयपी लसीकरण रेकॉर्ड एका प्लॅटफॉर्मवर संग्रहित करणे आहे, जे ओळखपत्राच्या पुराव्याशी जोडलेले आहे. त्याचप्रमाणे, ‘आयुष्मान भारत डिजिटल मिशन’ अंतर्गत आरोग्य सुविधांमध्ये वैद्यकीय रेकॉर्ड्स शेअर करण्यासाठी एक स्वतंत्र रचना तयार करण्यात येत आहे.

असे असले तरी, फिंगरप्रिंट-आधारित ओळख पडताळणीसोबतच या प्रणालींत वाढ केली जाईल, जे इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड (EMR) किंवा दस्तावेज-आधारित ओळख पडताळणीपेक्षा मुलांकरता अधिक परिणामकारक ठरेल. उदाहरणार्थ, मुलाचा यु-विन आयडी आहे, याची पालकांना माहिती नसू शकते आणि ते प्रत्येक वेळी वेगळ्या दस्तावेजासह त्यांची नोंदणी करू शकतात (किंवा चुकून अथवा फसवणुकीने अनेक बाल आधार तयार करण्यात आले आहेत), ज्यामुळे अपूर्ण रेकॉर्ड्सचे गुंतागुंतीचे जाळे तयार होते. ही समस्या या वस्तुस्थितीमुळे वाढू शकते की, व्यक्तींच्या (आणि विशेषत: लहान मुलांच्या) वेगवेगळ्या दस्तावेजांमध्ये जर नावाचे स्पेलिंग भिन्न असले तर ही समस्या अधिक वाढू शकते. ही समस्या भारतात मोठ्या प्रमाणावर आढळून येते. बायोमेट्रिक ओळख पटवून, बालक असलेल्या लाभार्थ्यांच्या आरोग्य सेवेच्या नोंदी (उदा. उपचार/लसीकरण नोंदी) जुळवणे अधिक अचूकतेने करता येईल, ज्यामुळे योग्य आरोग्य विषयक काळजी घेतली जाईल, याची तरतूद करता येते.

असे असले तरी, फिंगरप्रिंट-आधारित ओळख पडताळणीसोबतच या प्रणालींत वाढ केली जाईल, जे इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड (EMR) किंवा दस्तावेज-आधारित ओळख पडताळणीपेक्षा मुलांकरता अधिक परिणामकारक ठरेल.

ओळख पटविण्यातील जोखमीचा कागदोपत्री पुरावा दत्तक मुले/ सोडून दिलेली मुले, जी बेघर आहेत आणि जी वरचेवर स्थलांतर करतात अशा कुटुंबांकडे नसू शकतो. याचे कारण यापैकी अनेक व्यक्ती वैद्यकीय कागदपत्रे गमावू शकतात, किंवा त्यांना लसीकरण कार्ड आणि आधार कार्डसारखी ओळखपत्रे प्राप्त करण्यात अडचणी येतात.

पुढील वाटचालीचा मार्ग

बाल आधारसह (१-५ वयोगटातील) मुलांचे बायोमेट्रिक्स मिळवणे, असुरक्षित लोकसंख्येतील मुलांना आरोग्यसेवा अधिकाधिक उपलब्ध करून देऊन सार्वत्रिक आरोग्य कवच (UHC) प्राप्त करण्याच्या प्रक्रियेत मदत होऊ शकेल, तसेच आरोग्यसेवा पुरवठादारांनाही मदत मिळेल, सर्वसमावेशक वैद्यकीय इतिहास संकलित करण्यात आणि अजिबात डोस न घेतलेले अथवा ज्या मुलांचे डोस चुकलेले आहेत, अशी मुले ओळखण्यातील आव्हानांना तोंड देणाऱ्या अधिकाऱ्यांनाही मदत मिळू शकेल.

याचे दीर्घकालीन फायदेही होतील, आता ज्याप्रमाणे कल्याणकारी योजनांकरता लाभार्थी ओळखण्याकरता जसा उपयोग केला जात आहे, तशाच प्रकारे सरकारला बाल लाभार्थी अधिक चांगल्या प्रकारे (कमी गळतीसह) ओळखता येऊ शकतील. याखेरीज, जन्मानंतरच्या काही दिवसांतच अर्भकाच्या (० ते १ वर्ष वयोगटातील) फिंगरप्रिंट्स प्राप्त करण्याच्या अंतिम उद्दिष्टाच्या दिशेने हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल असेल, ज्यामुळे सरकारला जन्म नोंदणीची अचूकता सुधारता येईल आणि लोकसंख्येची चांगली आकडेवारी आणि सार्वजनिक आरोग्य धोरण नियोजनाचा फायदाही राखता येईल.


पुलकित आठवले हे सध्या सिडनी विद्यापीठात पदवीधर विद्यार्थी आहेत.

 

The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.