-
CENTRES
Progammes & Centres
Location
दहशतवाद हा आधुनिक जगाच्या सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे. तो अनेक रूपे आणि अर्थांनी समोर येतो; एका देशासाठी जो दहशतवादी असतो, तो दुसऱ्यासाठी स्वातंत्र्यसैनिक किंवा समाजसुधारकही ठरू शकतो. त्यांना वर्गीकृत करण्यासाठी वेगवेगळे निकष वापरले गेले तरी, विशेषतः निरपराधांना लक्ष्य करणारे आणि अनेकदा विनाशकारी पातळीवर पोहोचणारे जाणूनबुजून केलेले हिंसाचार हेच दहशतवादाचे मूळ वैशिष्ट्य आहे. दुर्दैवाने, जग अनेक दशकांपासून या संकटाने ग्रासलेले असूनही, दहशतवादाची एक सार्वत्रिक व्याख्या मान्य करण्यास अपयशी ठरले आहे.
दहशतवाद हा आधुनिक जगाच्या सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे. तो अनेक रूपे आणि अर्थांनी समोर येतो; एका देशासाठी जो दहशतवादी असतो, तो दुसऱ्यासाठी स्वातंत्र्यसैनिक किंवा समाजसुधारकही ठरू शकतो. त्यांना वर्गीकृत करण्यासाठी वेगवेगळे निकष वापरले गेले तरी, विशेषतः निरपराधांना लक्ष्य करणारे आणि अनेकदा विनाशकारी पातळीवर पोहोचणारे जाणूनबुजून केलेले हिंसाचार हेच दहशतवादाचे मूळ वैशिष्ट्य आहे. दुर्दैवाने, जग अनेक दशकांपासून या संकटाने ग्रासलेले असूनही, दहशतवादाची एक सार्वत्रिक व्याख्या मान्य करण्यास अपयशी ठरले आहे. परिणामी, हा शाप निरंतर नवीन रूपांमध्ये मानवजातीला त्रस्त करीत राहतो, आणि देशाच्या सुरक्षा व गुप्तचर यंत्रणांना प्रतिक्रिया देण्याआधीच किंवा दहशतवादाच्या नव्या पद्धती समजण्याआधीच निरपराधांचे प्राण घेत राहतो.
भारताचा पश्चिमेकडील शेजारी पाकिस्तान सतत दहशतवादी कारवायांचा माऱाच करत आला आहे. मुख्यत्वे जम्मू-कश्मीरमध्ये, परंतु भारताच्या इतर भागांतही, ज्यामध्ये ईशान्येकडील काही राज्यांचा समावेश आहे. चीननेही पूर्वी भारताच्या ईशान्य भागात बंडखोरी भडकवण्याचा प्रयत्न केला होता, हे सर्वमान्य आहे.
दहशतवादाचा मूळ उद्देश म्हणजे शत्रू देशाच्या राजकीय, आर्थिक, घटनात्मक, लष्करी किंवा सामाजिक संरचनांना अस्थिर करून त्या जागी दहशतवादी गटाची स्वतःची विचारसरणी बसवणे होय. जरी दहशतवाद प्राचीन काळापासून अस्तित्वात असला, आणि त्याने प्रचंड प्रमाणात जीवितहानी व विध्वंस केला असला, तरीही दहशतवादाने त्रस्त देशांमध्ये मूलभूत राजकीय बदल मात्र क्वचितच घडले आहेत. दुःखद बाब म्हणजे जगातील काही देशांनी दहशतवादाचा स्वतःच्या राष्ट्राच्या धोरणाचे अधिकृत साधन म्हणून अवलंब केला आहे. पाकिस्तान हा त्याचा सर्वात सातत्याने आणि विविध मार्गांनी वापर करणारा देश ठरतो, केवळ प्रदेशातच नव्हे तर त्यापलीकडेही. त्याचा प्रमुख संरक्षक चीन पाकिस्तानच्या कृत्यांचा कठोर निषेध करत नाही, ही गोष्ट समजणे कठीण आहे. याउलट, पूर्वी पाकिस्तानच्या दहशतवादाला उघडपणे दोष देणारी अमेरिका आता आपल्या स्वतःच्या कारणांमुळे पाकिस्तानच्या कारवायांकडे दुर्लक्ष करताना दिसते, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे आणि त्यामुळे पाकिस्तान आपल्या दुष्ट कारवायांना आणखी वेग देईल.
पाकिस्तान-प्रायोजित दहशतवादाचा दीर्घकालीन बळी ठरलेला भारत याच दहशतवादाच्या नवीन रूपाला अलीकडे सामोरा गेला ते म्हणजे “व्हाईट-कॉलर दहशतवाद”.
दहशतवादी संघटना बहुतेक वेळा सरकारच्या दहशतवादविरोधी यंत्रणांपेक्षा एक पाऊल पुढेच असतात. त्या सतत नवीन तंत्रे आणि रणनीती अवलंबून सुरक्षा यंत्रणांना चकवण्याचा प्रयत्न करतात. पाकिस्तान-प्रायोजित दहशतवादाचा दीर्घकालीन बळी ठरलेला भारत याच दहशतवादाच्या नवीन रूपाला अलीकडे सामोरा गेला ते म्हणजे “व्हाईट-कॉलर दहशतवाद”. 10 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या पार्किंग परिसरात उभी असलेली कार स्फोटाने उडाली. यात कारचालक म्हणजे कथित दहशतवादी डॉ. उमर नबी तसेच 14 इतर जण ठार झाले आणि अनेक जखमी झाले, तसेच मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले. त्याच सकाळी फरीदाबादमधील प्रसिद्ध अल-फला विद्यापीठात तयार झालेल्या याच दहशतवादी नेटवर्कशी संबंधित तीन डॉक्टरांची अटक झाली होती, हा केवळ योगायोग नव्हता. या घटनेने अत्यंत प्रशिक्षित वैद्यकीय व्यावसायिकांचा वापर करून परदेशातील हँडलर्सच्या सूचनांनुसार कार्य करणारे एक गंभीर, खोलवर रुजलेले दहशतवादी जाळे उघडकीस आले. पोलिस आणि NIA ने जलद कारवाई करत केवळ या डॉक्टरांना अटक केली नाही, तर जवळपास 3,000 किलोग्रॅम स्फोटके ही जप्त केली. ज्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्फोट घडवण्याची योजना असल्याचे स्पष्ट झाले. अल-फला विद्यापीठ आता ‘व्हाईट टेरर’ घडवणाऱ्या परिसंस्थेचे केंद्र म्हणून कठोर तपासाअंतर्गत आहे.
NIA आणि राज्य पोलिसांच्या देशभरातील छाप्यांमध्ये अत्यंत ज्वलनशील साहित्य, ऑटोमॅटिक रायफल्स आणि पिस्तुले, तसेच रासायनिक घटकांची निर्मिती करण्याच्या योजनांचे पुरावे मिळाले. ज्यात कथित ‘रिसिन प्लॉट’चाही समावेश आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये जम्मू-कश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मदचे पोस्टर्सही पोलिसांना सापडले होते. लाल किल्ला स्फोटानंतर या स्फोटकांचे J&K मध्ये ट्रान्स-शिपमेंट सुरू असताना बडगाम पोलिस ठाण्यात झालेला स्फोट आणि त्यात आणखी नऊ जणांचे मृत्यू ही अत्यंत दुःखद बाब ठरली आणि आपले स्फोटक विश्लेषक आणि तज्ज्ञ यांच्या हाताळणीतील गंभीर त्रुटी उघड झाल्या. असे अपघाती व टाळता येणारी जीवितहानी टाळण्यासाठी जप्त स्फोटक हाताळण्याचे अधिक विश्वसनीय आणि कठोर SOPs तातडीने तयार करणे आवश्यक आहे.
महत्त्वाचे म्हणजे, भारताने आता एक नव्या प्रकारचा दहशतवादी संघटनेचा समूह अनुभवला आहे. जो सुशिक्षित व्यक्तींनी, आणि आश्चर्य म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी उभारलेला आहे. या नव्या प्रकारच्या दहशतवादी कारवायांसाठी सर्व संकेत पाकिस्तानकडेच वळतात. पाकिस्तानचे नवीन सेना-प्रमुख आणि चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस, फील्ड मार्शल असीम मुनीर ज्यांना अमेरिकेच्या नव्या जवळीकीमुळे आणि पाकिस्तानच्या संसदेने दिलेल्या व्यापक सैन्य व न्यायिक अधिकारांच्या कायदेशीर कवचामुळे धीर आला आहे. यांच्या नेतृत्वाखाली ही आक्रमकतेची नवी लहर दिसत आहे.
अलीकडे उघड झालेला हा “व्हाईट-कॉलर दहशतवाद” अत्यंत गंभीर चिंतेचा विषय आहे. या प्रकारच्या दहशतवादाला धार्मिक आणि अंशतः राजकीय रंग दिला गेल्याने त्याचा धोका आणखी वाढला आहे. त्यामुळे या समस्येचा सामना करण्यासाठी संपूर्ण राष्ट्राच्या सामूहिक दृष्टिकोनाची गरज आहे.
एकूण पाहता, भारत आता एक विश्वसनीय टू-फ्रंट धोका भोगत आहे. त्यात वरून हा नवा व्हाईट-कॉलर दहशतवादही. त्यामुळे भारताची सुरक्षा तयारी सर्वोच्च पातळीवर असलीच पाहिजे. भारताच्या सशस्त्र दलांनी आपली आक्रमक आणि रक्षणात्मक क्षमता सातत्याने आणखी मजबूत करणे अत्यावश्यक आहे कारण शत्रूला रोखून धरू शकणारा सर्वात प्रभावी प्रतिबंधक घटक म्हणजे प्रचंड आणि ठोस सैन्य सामर्थ्य.
गुप्तचर यंत्रणा आणि प्रभावित राज्यांतील पोलिस दलांनी तळागाळातील माहिती संकलनाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवणे अत्यावश्यक आहे. शत्रूपक्षाकडून मिळणाऱ्या सर्व इनपुट्सचे केंद्र आणि राज्य संस्थांदरम्यान सुसंगत ज्ञानवाटप केल्यास मोठा फायदा होईल. व्हाईट-कॉलर नेटवर्क्स आणि संस्थांमध्ये घुसखोरी करणाऱ्या विशेष गुप्तचर प्रयत्नांची आखणी करावी लागेल, ज्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही आवश्यक ठरेल.
भारताने आवश्यकतेनुसार रणनीतिक संयमाच्या धोरणातून दंडात्मक प्रतिकाराच्या धोरणाकडे वळण्याची गरज आहे. तथापि, आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत पातळीवर भारताने एक दृढ, सतर्क आणि दहशतवादाबाबत “शून्य सहनशीलता” असलेला देश म्हणून दिसणेही महत्त्वाचे आहे. तितकेच सर्व नागरिकांशी न्याय्य आणि निष्पक्ष राहणेही आवश्यक आहे. शिक्षित युवकांना सीमापार प्रचाराच्या जाळ्यात अडकण्यापासून परावृत्त करण्यासाठी एक ठोस, सुयोजित कार्यक्रम स्वीकारला पाहिजे.
उदयोन्मुख जागतिक शक्ती म्हणून, भारताने आपल्या उभारणी आणि स्थैर्याला अडथळा आणण्याच्या शत्रूंच्या सर्व प्रयत्नांना यशस्वीपणे हाणून पाडले पाहिजे. दहशतवादाचे कोणतेही रूप आणि प्रॉक्सी युद्ध दोन्हींचा संपूर्ण पराभव करणे हीच सर्वोच्च प्राधान्ये राहिली पाहिजेत.
लेफ्टनंट जनरल कमल दावर हे भारताच्या डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीचे पहिले प्रमुख असून विख्यात स्टेट्रेजिक ॲनालिस्ट (विश्लेषक) आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Lt Gen Kamal Davar was the first Chief of Indias Defence Intelligence Agency and is a noted strategic analyst.
Read More +