Expert Speak Raisina Debates
Published on Jun 25, 2025 Updated 0 Hours ago

इराणच्या क्षमतेबद्दल वाढती शंका,  चीनमधले देशांतर्गत वातावरण आणि पश्चिम आशियातील सत्तास्पर्धेत थेट सामील न होण्याची भूमिका या सगळ्या कारणांमुळे चीनने इराणला सशर्त पाठिंबा दिला आहे.

चीनची इस्रायल-इराण युद्धावर चिंता: मध्यस्थी की स्वार्थ? दक्षिण आशियातील नवं संकट!

Image Source: Getty

    मध्य पूर्वेतील तणाव वाढल्यानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सार्वजनिकरित्या केलेल्या टिप्पणीनुसार, ‘इराणविरुद्ध इस्रायलच्या लष्करी कारवाईबद्दल चीन खूप चिंतित आहे आणि पश्चिम आशियामध्ये शांतता आणि स्थैर्य आणण्यासाठी रचनात्मक भूमिका बजावण्याच्या दृष्टीने चीन सर्व पक्षांसोबत काम करण्यास तयार आहे.’ चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची, इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन साअर आणि ओमानचे परराष्ट्र मंत्री सय्यद बद्र बिन हमद बिन हमूद अल्बुसैदी यांच्याशी आधीच चर्चा केली आहे. इराणवर हल्ला केल्याबद्दल चीनने इस्रायलची जाहीरपणे निंदा केली. तसेच चिनी हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आणि चिनी संस्था आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता राखण्यासाठी दोन्ही देशांनी सहकार्य करावे, अशीही भूमिका घेतली. सध्याच्या संकटात शांतता प्रस्थापित करणारा देश म्हणून चीन इस्रायल आणि इराण यांच्यात मध्यस्थी करण्याची शक्यताही तपासून पाहतो आहे.   

    चीनने इराणला म्हणावा तसा पाठिंबा दिलेला नाही. याचे कारण म्हणजे चीनमध्ये इराणची फार प्रतिष्ठा नाही. तिथे जनमत इराणच्या बाजूने नाही. इस्रायल आणि इराणमधला नवा संघर्ष पाहिला तर इराणचे भविष्य अंधकारमय आहे, अशी चर्चा इराणमध्ये आहे.

    चीनची प्रसारमाध्यमे, इंटरनेटवरील बातम्या आणि लेखांमध्ये इराणला भेडसावणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांवर चर्चा सुरू आहे. इराणमध्ये अनेक लोक देशद्रोही आहेत, या देशात बरेच विरोधाभास आहेत. त्याचबरोबर इराणवर खूप काळापासून निर्बंध लादले आहेत. त्यांची अर्थव्यवस्था कोसळते आहे, तंत्रज्ञान जुने आहे आणि लष्कर सक्षम नाही, अशी चर्चा चीनमध्ये होते आहे. इस्रायली हल्ल्यात इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी मारले गेल्याने आणि त्यांचे आण्विक तळ उद्ध्वस्त झाल्यामुळे चीनमधल्या इंटरनेटवर इराणवर बरीच टीका झाली. एकंदरीत चिनी नागरिकांना इराणबद्दल फारशी सहानुभूती नाही किंवा त्यांचा इराणला पाठिंबा नाही हेच दिसून आले. इराण इस्रायल आणि अमेरिकेला संघर्षात खेचून घेईल आणि त्यामुळे चीनवरचा दबाव थोडा कमी होईल, अशी अशा मात्र चीनच्या नागरिकांना वाटते आहे. 

    चीनमधील काही लोकांचा असा युक्तिवाद आहे की इराणने आपल्या देशात चिनी लष्करी तळाला परवानगी देण्यास नकार देणे, रेल्वे वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेणे, सीरियातील असद राजवटीचा निषेध आणि भारत-पाकिस्तान संघर्षात भारतासोबत धोरणात्मक सहकार्य करार करणे अशा कृती पाहिल्या तर इराणबद्दल चीनला तेवढा विश्वास वाटत नाही. इराणने चीनला पूर्णपणे स्वीकारलेले नाही, अशीही टीका त्यांच्यावर होत असते. रशिया आणि पाकिस्तानप्रमाणे इराणने चीनचा स्वीकार करणे टाळले आहे. इराणच्या राजवटीमध्ये आत्मसन्मान आणि स्वायत्ततेची तीव्र भावना आहे हे त्यामागचे कारण आहे. इराण एकाच देशावर जास्त अवलंबून राहण्यासही तयार नाही. शिवाय इराणी समाजात नेहमीच युरोपियन आणि अमेरिकेच्या समर्थनाची भावना आहे, असे काही चीनी तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 2015 मध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन, रशिया आणि जर्मनीने इराणशी अणु करार केल्यानंतरच्या काळातले त्यांचे हे निरीक्षण आहे. युरोप आणि अमेरिका इराणवरचे निर्बंध उठवतील आणि इराणला सहकार्य करतील अशी इराणची अवास्तव कल्पना आहे, असेही या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ट्रम्प प्रशासनाने 2017 मध्ये इराण अणुकरारातून माघार घेतली असली तरी सध्याची इराणी राजवट उत्तर कोरियासारखी अण्वस्त्रे विकसित करण्यासाठी पुरेशी दृढनिश्चयी दिसत नाही. त्याचबरोबर इराण अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांशी पूर्णपणे संबंध तोडणारही नाही. त्यामुळेच सध्याच्या परिस्थितीत इराण पूर्णपणे चीनला आलिंगन देणे अशक्य आहे. चीनबद्दल इराणी लोक बोलतात जास्त पण त्यांच्या कृतीत तसं दिसत नाही, असे म्हटले जाते. इराण चीनवर जास्त प्रमाणात अवलंबून आहे याचा इराणी लोकांना तिरस्कार आहे.

    चीनमधील काही लोकांचा असा युक्तिवाद आहे की इराणने आपल्या देशात चिनी लष्करी तळाला परवानगी देण्यास नकार देणे, रेल्वे वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेणे, सीरियातील असद राजवटीचा निषेध आणि भारत-पाकिस्तान संघर्षात भारतासोबत धोरणात्मक सहकार्य करार करणे अशा कृती पाहिल्या तर इराणबद्दल चीनला तेवढा विश्वास वाटत नाही.

    इराणची चीनबद्दलची भूमिका केवळ गुंतागुंतीची नाही तर रशियासारख्या देशांच्या तुलनेत तेवढी ठोसही नाही. गेल्या काही वर्षांत इराणने ‘शिया आर्क’ यशस्वीरित्या कायम ठेवले असते तर इराणकडे चिनी लोकांनी अधिक आदराने पाहिले असते. चीन सरकारचा अधिक पाठिंबा आणि सहानुभूती इराणला मिळाली असती. परंतु आता तशी परिस्थिती नाही. चिनी समीक्षक इराणबद्दल उघडपणे अविश्वास आणि नापसंती व्यक्त करत आहेत.

    Guancha.com मधल्या एका लेखात शीतयुद्धातला उदारतेचा काळ आता संपला आहे, असे नमूद करण्यात आले आहे. आजच्या काळात महासत्तेची मुत्सद्देगिरी आणि व्यावहारिकतेच्या माध्यमातून केली जाते, असेही यात म्हटले आहे. चीन आणि अमेरिका दोघांनाही मोठ्या प्रमाणात देशांतर्गत दबावांचा सामना करावा लागतो आणि म्हणूनच इतर देशांच्या प्रती उदारता दाखवण्याला कमी वाव आहे. महासत्तेची स्पर्धा तीव्र होत असताना ही प्रवृत्ती वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळेच इराणला कोणताही पाठिंबा हा सशर्त असेल, असे चिनी माध्यमांमध्ये सूचित करण्यात आले आहे.

    इराण गनिमी शैलीची रणनीती स्वीकारू शकला, इस्रायल आणि अमेरिकेशी दीर्घकाळ संघर्ष करत राहिला, वेळोवेळी इस्रायलवर क्षेपणास्त्रं हल्ले चढवत राहिला, हिजबुल्लाह आणि हुथींना बळकटी देत राहिला आणि सहयोगी देशांना इस्रायलच्या भूमध्यसागरीय बंदरांना नाकेबंदी करण्यास प्रोत्साहित करत राहिला तर युक्रेन आणि मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या गोंधळामुळे चीनला एक धोरणात्मक मोकळीक मिळू शकते. असे असले तरी इराणकडे असा सतत आणि पूर्णत्वाला नेणारा संघर्ष करण्याची क्षमता आहे का ? असा प्रश्न चिनी विश्लेषकांच्या मनात आहे. 

    इराण-इस्रायल किंवा इराण-अमेरिका संघर्षाचा इराणमधील चिनी गुंतवणुकीवर विशेषतः पायाभूत सुविधा आणि संबंधित सहाय्यक प्रकल्पांवर परिणाम होऊ देऊ नये याला चीनचे प्राधान्य आहे.

    चीनला इराणच्या लष्करी-औद्योगिक क्षेत्रात अधिक प्रवेश आणि सखोल धोरणात्मक सहभागासाठी व्यापक आर्थिक संधी मिळण्याचीही अपेक्षा आहे.  

    इराण हा शांघाय सहकार्य संघटना (SCO) आणि BRICS या दोन्हींचा सदस्य आहे. SCO आणि BRICS चे सदस्यत्व इराणला बाह्य दबावापासून वाचवू शकत नसेल तर या गटांची विश्वासार्हता तसेच एक उदयोन्मुख महासत्ता म्हणून चीनची स्वतःची प्रतिष्ठा यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होईल.

    इराणची तुलना लिबिया किंवा सीरियाशी करता येत नाही हे चीन जाणून आहे. इराण हा शांघाय सहकार्य संघटना (SCO) आणि BRICS या दोन्हींचा सदस्य आहे. SCO आणि BRICS  चे सदस्यत्व इराणला बाह्य दबावापासून वाचवू शकत नसेल तर या गटांची विश्वासार्हता तसेच एक उदयोन्मुख महासत्ता म्हणून चीनची स्वतःची प्रतिष्ठा यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होईल.

    या सर्व बाबींमुळे चीन इराणबद्दल काहिसा अडचणीत सापडला आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या दबावाखाली इराणमधील राजवट कोसळू नये असे चीनला वाटते. पण या टप्प्यावर चीनने इराणचे रक्षण करणे योग्य आहे की नाही याबद्दलही चीनी तज्ज्ञांना शंका आहे.


    अंतरा घोषाल सिंग या ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनमधील स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्रामच्या फेलो आहेत.

    The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.