-
CENTRES
Progammes & Centres
Location
एका बाजूला, २०३० सालापर्यंत ५०० गिगावॉट अक्षय ऊर्जा क्षमता गाठण्याचे भारताचे स्वप्न आहे. दर वर्षी १५ टक्के दराने वाढणारे हे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट, शाश्वत ऊर्जा निर्मितीच्या दिशेने महत्त्वपूर्ण बदल दर्शवते.
आपल्याकडे दोन स्वारस्यपूर्ण आख्याने आहेत, जी भारताची ऊर्जा संक्रमण कथा परिभाषित करतात.
एका बाजूला, २०३० सालापर्यंत ५०० गिगावॉट अक्षय ऊर्जा क्षमता गाठण्याचे भारताचे स्वप्न आहे. दर वर्षी १५ टक्के दराने वाढणारे हे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट, शाश्वत ऊर्जा निर्मितीच्या दिशेने महत्त्वपूर्ण बदल दर्शवते. या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी, ऊर्जा मागणी व्यवस्थापन व निर्मिती सेवांची श्रेणी प्रदान करण्यासाठी तसेच कमी खर्चात नियमित वीज पुरवठा करणाऱ्या व कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या प्रकल्पांच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी विविध अर्थसहाय्य दिले जात आहे. प्रत्येक कॉर्पोरेट ‘सीटीयू’ (सेंट्रल ट्रान्समिशन युटिलिटी) ग्रिड्ससह ऊर्जा मागणी व्यवस्थापन व निर्मिती सेवांची श्रेणी प्रदान करणाऱ्या तसेच कमी खर्चात नियमित वीज पुरवठा करणाऱ्या व कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या बाजारपेठेद्वारे त्यांच्या ऊर्जा संक्रमण योजनांना गती देत आहे. कमी-कार्बन उत्सर्जन करणारी अर्थव्यवस्था तयार करण्यावर आणि २०७० पर्यंत निव्वळ-शून्य उत्सर्जन साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासोबतच नवीन क्षेत्रेही उदयास येत आहेत. उदाहरणार्थ, अनेक स्टार्टअप्स आणि कॉर्पोरेट कंपन्या नव्या हवामान तंत्रज्ञानाची निर्मिती करत आहेत, ज्याद्वारे स्टील, सिमेंट आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्रांतील कार्बन उत्सर्जन दूर होईल, कमी दरांत जलद विकल्या जाणाऱ्या ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या उत्पादन मूल्य साखळीतील हायड्रोकार्बन्सचा वापर दूर करण्यासाठी घातक रासायनिक पदार्थांचा वापर किंवा निर्मिती कमी होईल आणि उत्पादन उद्योगांमध्ये रासायनिक बर्नरचा वापर बदलून त्याजागी ‘ग्रीन हायड्रोजन’ वापरला जाईल.
कमी-कार्बन उत्सर्जन करणारी अर्थव्यवस्था तयार करण्यावर आणि २०७० पर्यंत निव्वळ-शून्य उत्सर्जन साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासोबतच नवीन क्षेत्रेही उदयास येत आहेत.
दुसर्या बाजूला, वितरण कंपन्या आधीच ६.११ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या संचित तोट्यामुळे आव्हानांचा सामना करत आहेत. गेल्या १० वर्षांत, नियामक मानकांच्या तुलनेत एकूण तांत्रिक, व्यावसायिक आणि संग्रह (एटीसीअँडसी) नुकसानाच्या उच्च पातळीमुळे सार्वजनिक वितरण कंपन्या तणावग्रस्त आहेत— त्यांच्या पुरवठा खर्चाच्या संदर्भातील कमी दरामुळे (पुरवठ्याच्या खराब गुणवत्तेमुळे ग्राहकांकडून कमी रोख संकलनामुळे) देशभरातील या नुकसानाची सरासरी २४ टक्के आहे. ‘ओपन अॅक्सेस सोल्यूशन’ शोधत असलेले कॉर्पोरेट्स, वितरण कंपन्यांची आर्थिक स्थिती आणखी बिघडवतील आणि मालमत्तेच्या वापराच्या स्तरावर (औष्णिक निर्मिती आणि पारेषण) लक्षणीय परिणाम करतील, जे आधीच वाईट स्थितीत आहेत.
या स्वारस्यपूर्ण कथेचा शोध घेत असताना, दोन्ही बाजूंना साहाय्य करणारे आणि समतोल साधू शकणारे उपाय आपण योजायला हवे. आज आपल्याला सामोरे जावे लागत आहे, त्या वितरण कंपन्यांच्या आर्थिक स्थितीच्या वास्तवाकडे, भारताच्या ऊर्जा संक्रमणाच्या कहाणीला दुर्लक्ष करता येणार नाही. ‘एजग्रिड’वर, आम्ही या माहिती-चालित ऊर्जा संक्रमणाचे नेतृत्व करत, वितरण कंपन्यांना आणि ग्रिड्सना शाश्वत बनवत आहोत.
व्यापकपणे सांगायचे तर, ऊर्जा संक्रमणावर लक्ष केंद्रित केल्याने मोठ्या आणि जागतिक कंपन्यांना झुकते माप दिले गेले आहे. ज्यामुळे जवळच्या महत्त्वाच्या वितरण केंद्रापासून घर किंवा व्यवसायासारख्या अंतिम गंतव्यस्थानापर्यंत मालाची वाहतूक करणाऱ्या बाजारपेठेकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे या क्षेत्रातील ६५ टक्क्यांहून अधिक बाजारपेठ दुर्लक्षित आहे. हवामानाला हानीकारक ठरणार नाही, अशा अर्थव्यवस्थेचा पाठपुरावा करताना, या जवळच्या वितरण केंद्रापासून घर किंवा व्यवसायासारख्या अंतिम गंतव्यस्थानापर्यंतच्या बाजारपेठेकडे दुर्लक्ष करता कामा नये आणि संक्रमण परिणामकारक व फायदेशीर दोन्ही असायला हवे. ऊर्जा संक्रमणामध्ये त्यांची भूमिका बजावण्यासाठी, विद्युतीकृत दुचाकी (२ वॉट) आणि तीन-चाकी वाहने (३ वॉट) सज्ज झाली आहेत. गाड्यांचा ताफा असलेल्यांनी आणि व्यावसायिक वाहनांनीही त्यांचे अनुकरण केल्याने, वापरकर्त्यांची संख्या (आणि म्हणून विद्युत उर्जेची मागणी) अंतिम गंतव्यस्थानापर्यंत वेगाने वाढेल. शिवाय, हवामान बदलाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी फक्त इलेक्ट्रिक वाहने स्वीकारणे पुरेसे नाही; इलेक्ट्रिक वाहनांची वाहतूक स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा स्त्रोतांद्वारे (कोळशावर चालणार्या ग्रिडऐवजी अक्षय ऊर्जा क्षमतेने) करणे महत्त्वाचे आहे.
ऊर्जा संक्रमणावर लक्ष केंद्रित केल्याने मोठ्या आणि जागतिक कंपन्यांना झुकते माप दिले गेले आहे. ज्यामुळे जवळच्या महत्त्वाच्या वितरण केंद्रापासून घर किंवा व्यवसायासारख्या अंतिम गंतव्यस्थानापर्यंत मालाची वाहतूक करणाऱ्या बाजारपेठेकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे या क्षेत्रातील ६५ टक्क्यांहून अधिक बाजारपेठ दुर्लक्षित आहे.
द्विपक्षीय वीज खरेदी करार व राज्य-चालित ऊर्जा पारेषणपासून ते लोकशाही आणि परवानाकृत बाजारपेठेतील ऊर्जेपर्यंत, जिथे व्यावसायिक, औद्योगिक आणि निवासी कंपन्या स्वतःची ऊर्जा खरेदी करू शकतात, विकू शकतात आणि उत्पादन करू शकतात, अशा पद्धतीने ग्रिडशी ग्राहकांचा संवाद साधण्याचा मार्ग मूलभूतपणे बदलत आहे. यामुळे नवीन उपाय उदयाला येण्याची संधी निर्माण होते: जे अंतिम ग्राहकांचा खर्च कमी करतात, ग्रीडमध्ये अक्षय क्षमतेचे एकत्रीकरण करून हवामान बदलाचा वेग कमी करतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शाश्वतता आणि ऊर्जा नफा ग्राहकांसाठी नवी आर्थिक संधी निर्माण करतात.
‘एजग्रिड’वर, आम्ही ‘शून्य-कार्बन’ भविष्याकडे जाण्याचा मार्ग गतिमान करण्यासाठी आणि माहिती-चालित ऊर्जा संक्रमणाद्वारे वितरण साखळीतील अंतिम ग्राहकांची पूर्तता करण्यासाठी वितरित ग्रिडसाठी डिजिटल पायाभूत सुविधा तयार करत आहोत. ऐतिहासिकदृष्ट्या, ग्रीड्सची रचना केंद्रीकृत वीज निर्मिती आणि एकदिशात्मक प्रामुख्याने जीवाश्म इंधनाद्वारे इंधन ऊर्जा प्रवाहाभोवती केली गेली होती. मात्र, अक्षय ऊर्जेमुळे खर्चात घट होते, इलेक्ट्रिक वाहनांचा उदय आणि वितरित ऊर्जा संसाधने यांच्या वाढीने, स्वीकारार्हतेत महत्त्वपूर्ण बदल घडत आहे.
‘एजग्रिड’ची दृष्टी ‘सॉफ्टवेअर कार्बन गिळंकृत करू शकते,’ या विश्वासावर केंद्रित आहे, याचाच अर्थ असा आहे की, ऊर्जा व्यवस्थापित करण्यासाठी माहिती-स्तर आणि स्मार्ट सॉफ्टवेअरचे उपाय योजल्याने ग्रीड अधिक कार्यक्षम बनेल आणि ग्राहकांना कमी खर्चात अधिक शाश्वत आणि कार्यक्षम ऊर्जा मिळू शकेल.
ऑनसाइट सौर, वारा आणि बॅटरी स्टोरेज, तसेच ईव्ही चार्जर्स आणि मायक्रोग्रिड्स यांसारखी वितरित ऊर्जा संसाधने, औद्योगिक व्यवसायांमध्ये त्यांची ऊर्जा व्यवस्थापन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वाढत्या प्रमाणात प्रचलित आहेत. अलिकडच्या वर्षांत वितरित ऊर्जा संसाधनांच्या खर्चात झपाट्याने घट झाली आहे, ज्यामुळे धोरणात्मक प्रोत्साहनाशिवाय, ही संसाधने पारंपरिक ऊर्जा स्रोतांना मागे टाकतात. वितरण कंपन्यांसाठी, अधिकाधिक औद्योगिक ग्राहक त्यांच्या ऊर्जेचा वापर वाढत्या अत्याधुनिक ऊर्जा व्यवस्थापन प्रणालींशी जोडत असल्याने, वितरण कंपन्या या संसाधनांचा वापर करून विजेच्या वापरातील कमाल मागणी किंवा असामान्य वाढ पूर्ण करू शकतात आणि या नवीन लवचिकतेचा वापर करून वीज पुरवठा आणि मागणी यांचा समतोल साधण्यास मदत करू शकतात. मोठ्या प्रमाणात सौर आणि पवन ऊर्जा (जी अधून-मधून असू शकते) वाढते.
अलिकडच्या वर्षांत वितरित ऊर्जा संसाधनांच्या खर्चात झपाट्याने घट झाली आहे, ज्यामुळे ही संसाधने पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांना- अगदी धोरणात्मक प्रोत्साहनाशिवाय मागे टाकतात.
‘एजग्रिड’ चे उद्दिष्ट आहे की, या उद्योगाच्या रूपांतरणाचे भांडवल करून माहिती आणि बाजारपेठ व्यासपीठ तयार करणे, जे वितरित ऊर्जा संसाधनांचे प्रभावीपणे एकात्मिकीकरण करू शकतात, व्यवस्थापन करू शकतात आणि कमाल वापर करू शकतात, जेणेकरून या मालमत्ता एकत्रितपणे इलेक्ट्रिक ग्रिड आणि ऊर्जा अंतिम गंतव्यस्थानातील ग्राहकांना अधिक कार्यक्षमतेने योगदान देऊ शकतील. चार प्रमुख संकल्पनात्मक क्षेत्रे आहेत, ज्यावर ‘एजग्रिड’ लक्ष केंद्रित करते:
१. वितरित आणि कार्बनरहित ऊर्जा: ‘एजग्रिड’चे यश स्थानिक समुदायांना ग्रीडसह सहयोग करण्यासाठी आणि त्यांची अक्षय ऊर्जा निर्मिती आणि व्यवस्थापित करण्यासाठी सक्षम बनवत आहे. ग्रिड आणि ग्राहकांना फायदेशीर असलेल्या ठिकाणी- छतावर आणि वितरित केलेल्या सौर प्रकल्पांमध्ये त्यांना प्रवेश देत, वापरकर्त्यांना ग्रीडपासून स्वतंत्रपणे ऊर्जा निर्मिती आणि वापर करण्याची मुभा व्यासपीठ देते आणि त्यांना ऊर्जा क्रेडिट्सच्या स्वरूपात परस्परांशी व्यवहार करता येतो. ऊर्जेचे हे लोकशाहीकरण माहितीवर-आधारित आहे.
२.मागणी लवचिकता किंवा व्हर्च्युअल बॅटरी: मागणीतील लवचिकता ग्राहकांना बाजारपेठेनुसार आकारला गेलेला दर आणि ग्रिड परिस्थितींवर आधारित ऊर्जेचा वापर करण्यास मुभा देते. ‘एजग्रिड’ च्या डिजिटल पायाभूत सुविधा व्हर्च्युअल बॅटरी संकल्पना सक्षम करते, जिथे पुरवठ्याशी जुळण्याकरता ऊर्जेचा कमाल वापर केला जाऊ शकतो, यामुळे भौतिक ऊर्जा संचयनाची गरज कमी होते आणि ग्रीड स्थिरता सुधारते.
३. ऊर्जा साठवण किंवा रिअल बॅटरी: नूतनीकरणयोग्य स्रोतांपासून निर्माण होणारी अतिरिक्त ऊर्जा साठवण्यासाठी आणि कमी उत्पादनाच्या कालावधीत विश्वसनीय वीज पुरवठा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने ऊर्जा साठवणीचे उपाय महत्त्वपूर्ण ठरतात. ‘एजग्रिड’चे उद्दिष्ट ऊर्जा परिसंस्थेमध्ये ‘रिअल बॅटरी’ उपाय एकात्मिक करण्यासाठी ग्रिडची लवचिकता वाढवणे आणि कमाल मागणी दरम्यान पारंपरिक उर्जा स्रोतांवरील अवलंबित्व कमी करणे हे आहे.
४. ग्रिडचे आधुनिकीकरण: भारताच्या ऊर्जा क्षेत्राच्या बदलत्या गतिमानतेला सामावून घेण्यासाठी ग्रिडचे आधुनिकीकरण महत्त्वाचे आहे. ‘एजग्रिड’ ची डिजिटल पायाभूत सुविधा सध्याच्या ग्रिड पायाभूत सुविधांना अद्ययावत आणि कमाल करण्यात मदत करेल, ज्यामुळे वितरित ऊर्जा संसाधनांचे अखंड एकात्मीकरण आणि सुधारित ऊर्जा वितरण शक्य होईल.

१. अखंड अक्षय ऊर्जेसोबत एकात्मीकरण साधण्यासाठी नियामक चौकट: ऊर्जा संक्रमणाला गती देण्यासाठी, नूतनीकरण क्षमतेच्या अखंड एकात्मीकरणास प्रतिबंध करणार्या नियमांचे जटिल जाळे सोडवणे अत्यावश्यक आहे. ‘एजग्रिड’ एका प्रगतीशील नियामक चौकटीचे समर्थन करते, जे केवळ अक्षय ऊर्जा स्त्रोतांचा अवलंब करण्यास उत्तेजन देते असे नाही, तर अक्षय ऊर्जेचा वापर केल्यास प्रोत्साहनपर योजनाही राबवते. अशी चौकट अर्थसहाय्यावर किंवा प्रोत्साहनांवर अवलंबून राहता कामा नये; त्याऐवजी, नियामक चौकटीत ऊर्जा क्षेत्रातील शाश्वतता आणि नफा सुसंवाद साधणाऱ्या बाजारपेठेची तत्त्वे रुजायला हवी.
२. ऊर्जा संक्रमणाचे समर्थक म्हणून वितरण कंपन्यांची प्रतिबद्धता: ऊर्जा संक्रमण परिसंस्थेतील इतर प्रमुख भागधारकांसह वितरण कंपन्यांच्या सक्रिय सहभागाची मोठी कमतरता आहे. ‘एजग्रिड’ वितरण कंपन्यांसोबत सहकार्य वाढवण्यास कटिबद्ध आहे. त्यांना या परिवर्तनामुळे होऊ शकणारे असंख्य लाभ कथन करणे आणि त्याच वेळी, वितरण कंपन्यांना आर्थिक मदत करणे तसेच संपूर्ण ग्रिडसाठी ऊर्जा संक्रमणाला गती देणारे उपाय सह-विकसित करणे आदी महत्त्वाची कामे ‘एजग्रिड’ करू शकते.
३. वितरित ऊर्जा संसाधनांना वित्तपुरवठा: अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचणाऱ्या बाजारपेठेत अनेकदा वित्तीय संस्था आणि बँकांकडून केली जाणारी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आवश्यक असलेली उच्च पतयोग्यता नसते. मात्र, विविध भागधारकांच्या योग्य हस्तक्षेपाने, हे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात. ‘एजग्रिड’ एक बाजारपेठ चौकट स्थापित करण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहे, जी वितरित ऊर्जा संसाधन प्रकल्पांच्या पैसे कमविण्याच्या क्षमतेला संबोधित करते.
या आव्हानांवर, एकत्रित प्रयत्नांद्वारे आणि धोरणात्मक उपक्रमांद्वारे मात केल्यावर, शाश्वत आणि सर्वसमावेशक ऊर्जा परिसंस्थेचा अधिक नितळ आणि जलद संक्रमणाचा मार्ग मोकळा होईल.
वितरित ग्रिडसाठी ‘एजग्रिड’ च्या डिजिटल पायाभूत सुविधांचे उद्दिष्ट स्वच्छ ऊर्जेतील उपलब्धतेचे लोकशाहीकरण करणे आणि ग्राहकांना शाश्वत निवड करण्यात सक्षम करणे हे आहे. अक्षय ऊर्जा अधिकाधिक प्रबळ होत आहे आणि ग्राहक शाश्वत पर्याय शोधत आहेत, यांतून वितरित ग्रिड ऊर्जेचे भविष्य दिसून येते. खर्च कपात सक्षम करून, अक्षय एकात्मतेला चालना देऊन आणि व्यावसायिक, औद्योगिक आणि निवासी ग्राहकांचे सबलीकरण करून, ‘एजग्रिड’ अंतिम टप्प्यावर मानवी-केंद्रित ऊर्जा संक्रमणाचा मार्ग मोकळा करत आहे, सर्वांकरता शाश्वत ऊर्जा भविष्याला चालना देत आहे.
सुनील तल्ला हे ‘एजग्रीड’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी आहेत.
मुश्ताक अहमद हे ‘एजग्रिड’चे सह-संस्थापक आहेत.
वामसी टीपी हे ‘एजग्रिड’चे सह-संस्थापक आहेत.
नीरज सनसनवाल हे ‘एजग्रिड’चे सह-संस्थापक आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.