प्राण्यांकडून मानवामध्ये होणाऱ्या रोगसंक्रमणाचे धोके आरोग्य क्षेत्राच्या कार्यापद्धतीच्या बाहेरचे आहेत, असे एव्हियन एन्फ्लूएंझाचा जागतिक स्तरावर पुन्हा झालेल्या उद्रेकातून स्पष्ट होते. त्यामुळे साथरोगाला तोंड देण्यासाठी सज्जता आणि एकात्मिक ‘वन हेल्थ’ आराखड्याची गरज असल्याचे यातून अधोरेखित होते.
एव्हियन एन्फ्लूएन्झा अथवा बर्ड फ्लू (H5N1 विषाणूमुळे होणारा) हा विषाणूंपासून होणारा एक संसर्गजन्य रोग आहे. हा रोग प्रामुख्याने पाळीव व वन्य पक्ष्यांमध्ये आणि क्वचित सस्तन प्राण्यांमध्येही आढळतो. या रोगाचा डिसेंबरच्या अखेरीस केरळमध्ये उद्रेक झाल्याच्या वृत्तास संबंधित प्रशासनाकडून दुजोरा मिळाला. या रोगामुळे कुक्कुटपालन व्यवसायावर परिणाम झाला आहे. या प्रकारचे एन्फ्लुएंझा विषाणू सामान्यतः पक्ष्यांना लक्ष्य करीत असले, तरी संक्रमित पक्ष्यांच्या संपर्कातून अथवा कुक्कुटपालन केंद्रे आणि पक्ष्यांच्या विक्री बाजारपेठांसारख्या फैलाव झालेल्या ठिकाणांमधून या रोगाचा मानवामध्येही फैलाव होऊ शकतो. H5N1 विषाणूचा मानवाकडून मानवामध्ये फैलाव झाल्याच्या कोणत्याही घटनेची अद्याप नोंद झालेली नाही. मात्र या विषाणूंमध्ये प्रजातीच्या मर्यादा ओलांडण्याची म्हणजेच पक्ष्यांकडून मानवामध्ये संक्रमित होण्याची क्षमता असून त्यामुळे जगावर आरोग्याचे संकट ओढवू शकते, असा इशारा शास्त्रज्ञांनी गेल्या काही वर्षांपूर्वीच दिला आहे. या धोक्यामुळे मानव व प्राणी यांच्यातील संपर्कातून उद्भवणाऱ्या रोगांना समजून घेण्याची आणि त्यावर उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे; तसेच जागतिक स्तरावरील आरोग्य प्रशासनाला ‘वन हेल्थ’ दृष्टिकोनाचे महत्त्व दाखवून दिली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अंदाजानुसार, दर वर्षी एक अब्ज लोकांना फ्लूचा संसर्ग होतो. त्यांपैकी सुमारे 35 लाख लोकांचा आजार गंभीर होतो आणि त्यातील काही लाख मृत्युमुखी पडतात.
एन्फ्लुएंझा हा अनेक शतकांपासून सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक मानला जात आहे आणि एन्फ्लुएंझाच्या पहिल्या नोंदवलेल्या साथरोगाचा उद्रेक 1510 मध्ये झाला होता. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अंदाजानुसार, दर वर्षी एक अब्ज लोकांना फ्लूचा संसर्ग होतो. त्यांपैकी सुमारे 35 लाख लोकांचा आजार गंभीर होतो आणि त्यातील काही लाख मृत्युमुखी पडतात. ऑर्थोमायक्सोव्हायरस नावाच्या विषाणूंच्या प्रजातीशी संबंधित असलेल्या एन्फ्लूएंझा विषाणूंचे अनेक वेगवेगळे उपप्रकार अस्तित्वात आहेत. त्यांपैकी ए व बी हे दोन मानवासाठी अधिक धोकादायक आहेत. विशेषतः ‘एन्फ्लूएंझा ए’मुळे विसाव्या शतकाच्या प्रारंभीपासून चार वेळा जागतिक साथ पसरली होती. ‘एन्फ्लूएंझा बी’मुळे अद्याप साथरोगाचा फैलाव झालेला नाही, ‘एन्फ्लूएंझा सी’मुळे झालेले आजार सौम्य असतात आणि ‘एन्फ्लूएंझा डी’ मानवामध्ये संक्रमित होत नाही. 1918 मध्ये आलेल्या स्पॅनिश फ्लूचा फैलाव ‘एन्फ्लूएंझा बी’ प्रकारच्या H1N1 मुळे झाला होता. या विषाणूंमुळे त्या काळात एक तृतीयांश लोकांना संसर्ग झाला होता आणि जगभरातील सुमारे पाच कोटी लोक मृत्युमुखी पडले होते. दर वर्षी एन्फ्लूएंझा ए व बीचे वेगवेगळे प्रकार उदयास येतात. यांमुळे फ्लूची साथ येते. उदाहरणार्थ, अमेरिकेत 2024-25 मध्ये आलेला फ्लू प्रामुख्याने H1N1 आणि H3N2 प्रकारामुळे झाला होता, असा अहवाल सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) ने दिला होता.
दरम्यान, 1996 मध्ये चीनमध्ये पहिला रुग्ण आढळल्यापासून बर्ड फ्लूचा (एन्फ्लुएंझा एचा एक उपप्रकार H5N1) फैलाव गेल्या काही वर्षांपासून जगभरात वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते 2003 ते 2024 च्या दरम्यान H5N1 चे 900 मानवी रुग्ण नोंदवले गेले. त्या वेळी मृत्यूदर 48 टक्के होता. जनुकीयदृष्ट्या संबंध असलेल्या स्वाईन फ्लू अशी ओळख असलेल्या H1N1 विषाणूमुळे 2009 मध्ये साथरोगाचा जागतिक फैलाव झाला होता. त्यात जगभरात 1,51,700 ते 5,75,400 मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला होता. H5N1 चा सध्याचा उद्रेक 2021 मध्ये उत्तर अमेरिकेत झाला आणि त्यामुळे 18 कोटींपेक्षाही अधिक पक्ष्यांना बाधा झाली होती. त्या व्यतिरिक्त 2024 च्या मार्च महिन्यात H5N1 विषाणू सर्वप्रथम गायींमध्ये आढळल्यापासून एक हजार गायींना याचा संसर्ग झाला आहे. मानवामध्ये H5N1 ची बाधा होण्याची सत्तर प्रकरणे अमेरिकेत नोंदवली गेली आहेत. त्यातील एका रुग्णाचा मृत्यू ओढवला होता.
गेल्या महिन्यात केरळमध्ये बदके व कोंबड्या अनपेक्षितपणे मोठ्या संख्येने मृतावस्थेत आढळल्यानंतर H5N1 चा फैलाव झाल्याचे निदर्शनास आले. रॅपिड रिस्पॉन्स टीमने (RRT) तातडीने जैवसुरक्षा नियम लागू केले. त्यात बाधीत पक्ष्यांसह अंडी व कुक्कुटखाद्य नष्ट करणे यांसारख्या उपाययोजनांचा अंतर्भाव होता.
गेल्या महिन्यात केरळमध्ये बदके व कोंबड्या अनपेक्षितपणे मोठ्या संख्येने मृतावस्थेत आढळल्यानंतर H5N1 चा फैलाव झाल्याचे निदर्शनास आले. रॅपिड रिस्पॉन्स टीमने (RRT) तातडीने जैवसुरक्षा नियम लागू केले. त्यात बाधीत पक्ष्यांसह अंडी व कुक्कुटखाद्य नष्ट करणे यांसारख्या उपाययोजनांचा अंतर्भाव होता. या साथरोगाचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण केरळ राज्यात देखरेख व प्रतिबंधात्मक उपाययोजना वाढवण्यात आल्या. 2025 च्या जानेवारी महिन्यात H5N1 विषाणूचा संसर्ग झाल्याने महाराष्ट्रात तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला. पिंजऱ्यात असलेल्या वन्य प्राण्यांचा या साथीमुळे मृत्यू होण्याची देशातील ही पहिलीच घटना होती.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते (WHO) H5N1 मुळे सर्वसामान्य जनतेला सार्वजनिक आरोग्यावर घाला येण्याचा धोका कमी असतो आणि व्यावसायिक कारणांमुळे संपर्कात आलेल्या व्यक्तींसाठी तो कमी ते मध्यम स्वरूपाचा असतो. मानवासाठी व्यावसायिकदृष्ट्या H5N1साठी कोणतीही लस उपलब्ध नाही. कारण या संसर्गाचे रुग्ण तुलनेने दुर्मीळ असतात. त्यामुळे लोकसंख्येच्या पातळीवर लसीकरण आवश्यक मानले जात नाही. त्याचप्रमाणे सीझननुसार येणाऱ्या फ्लूच्या लसी एव्हियन एन्फ्लूएंझापासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने तयार केलेल्या नाहीत.
एव्हियन एन्फ्लूएंझा प्राण्यांच्या आरोग्यावर परिणाम करतो व त्यांच्या मृत्यूचे कारणही ठरतो, शिवाय तो अन्नसुरक्षेवर, जागतिक अन्न पुरवठा साखळ्यांवरही परिणाम करतो आणि जैववैविधतेची हानी करतो. उदाहरणार्थ, अमेरिकेतील सध्याच्या उद्रेकामुळे अंड्यांची टंचाई निर्माण झाली असून त्यामुळे भाववाढही झाली आहे. त्याचप्रमाणे जनावरांमध्ये H5N1 मुळे दूधाचे उत्पादन कमी होत असल्याने दूधाच्या एकूण उत्पादनातही घट झाली आहे. एव्हियन एन्फ्लूएंझाच्या फैलावामुळे मानव व पशू-पक्ष्यांच्या आरोग्याच्या समस्येप्रमाणेच अन्नसुरक्षा आणि आर्थिक आव्हाने निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापार व जागतिक पुरवठा साखळ्यांवर परिणाम होतो.
एव्हियन एन्फ्लूएंझाच्या फैलावामुळे मानव व पशू-पक्ष्यांच्या आरोग्याच्या समस्येप्रमाणेच अन्नसुरक्षा आणि आर्थिक आव्हाने निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापार व जागतिक पुरवठा साखळ्यांवर परिणाम होतो.
एव्हियन एन्फ्लूएंझाच्या विषाणूंमध्ये महत्त्वपूर्ण अनुवांशिक बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो प्रजातींची मर्यादा ओलांडून थेट मानवामध्ये संक्रमित होऊ शकेल, अशी चिंता शास्त्रज्ञांनी प्रामुख्याने व्यक्त केली आहे. एन्फ्लूएंझा विषाणू हे नियमितपणे उत्परिवर्तन किंवा किरकोळ अनुवांशिक बदल होत असणारे RNA विषाणू आहेत. या बदलांमुळे त्यांची संसर्गक्षमता किंवा रोगनिर्मिती क्षमता बदलू शकते. हे पाहता जवळजवळ दर वर्षीच नव्या फ्लू लसींची गरज का भासते, या प्रश्नाचे मूळ कारण समजू शकते. विषाणूंमध्ये मोठे अनुवांशिक बदल झाल्याने एका प्रजातीतून दुसऱ्या प्रजातीत संसर्ग फैलावण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकते. एन्फ्लूएंझा विषाणूंमध्ये जनुकीय अदलाबदलीमुळे म्हणजेच फ्लूच्या प्रकारांमधील अनुवांशिक घटकांच्या देवाणघेवाणीतून असे होऊ शकते. मानवाची अथवा प्राण्याची पेशी एकाच वेळी दोन प्रकारच्या विषाणूंनी संक्रमित होते, तेव्हा असे होऊ शकते. आकृती 1 मध्ये स्पष्ट केलेली गोष्ट म्हणजे, जर मानवी पेशीला एव्हियन फ्लू विषाणू आणि सिझनल फ्लूच्या विषाणूचा एकाच वेळी संसर्ग झाला, तर संभाव्य जनुकीय अदलाबदल कशी होऊ शकते. यातून एक नव्या प्रकारचा विषाणू तयार होतो, त्याची रोगनिर्मिती क्षमता समजू शकत नाही आणि त्यावर कोणतीही लस उपलब्ध नसते. त्याचप्रमाणे तो मानवामध्ये संक्रमण करण्यास सक्षम असतो.
आकृती 1: फ्लू विषाणूची जनुकीय अदलाबदल कशी होते, त्याचे आकृतीरूपातील प्रात्यक्षिक
स्रोत: सायंटिफिक अमेरिकन
2009 मध्ये आलेल्या स्वाइन फ्लू साथरोगासह माणसाला होणाऱ्या एक वगळता सर्व साथरोगांसाठी ही दुर्मीळ समजली जात असली, तरी जनुकीय अदलाबदलच जबाबदार आहे. त्यामध्ये मानव, डुक्कर आणि पक्ष्यांमधील एन्फ्लुएंझाच्या विषाणूची जनुकीय अदलाबदल झाली होती. पक्ष्यांच्या एन्फ्लुएंझाच्या प्रकारांमध्ये जनुकीय अदलाबदल होणे तुलनेने सामान्य आहे आणि 2020 पासून त्याचे प्रमाण वाढत आहे. पाळीव कोंबड्या, वन्य पक्षी आणि गायींमध्ये सीझनल फ्लूच्या विषाणूसह H5N1 च्या अनेक प्रकारांचा फैलाव होत असल्यामुळे वेळोवेळी एक नवा प्रकार येणे ही सामान्य गोष्ट आहे. भारतातील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अभ्यासानुसार, दोन ते दहा व्यक्तींना H5N1 चा संसर्ग झाल्यानंतर मानवाकडून मानवामध्ये वेगाने संसर्ग होण्याची शक्यता आहे. प्राण्यांमध्ये झालेला संसर्ग माणसांमध्ये फैलावण्याची सुरुवात होणे आणि माणसांमध्ये त्याचा वेगाने फैलाव होणे या दोहोंमधील कालावधी अल्प असतो, असे या अभ्यासातून दिसून येते. जनुकीय अदलाबदल होण्याचे प्रमाण अत्यल्प असले, तरी संभाव्य बदलांवर लक्ष ठेवण्यासाठी मानव, प्राणी आणि पर्यावरणीय यंत्रणा यांच्यावर सातत्याने देखरेख ठेवणे गरजेचे आहे.
2009 मध्ये आलेल्या स्वाइन फ्लू साथरोगासह माणसाला होणाऱ्या एक वगळता सर्व साथरोगांसाठी ही दुर्मीळ घटना असली, तरी जनुकीय अदलाबदलच जबाबदार आहे. त्यामध्ये मानव, डुक्कर आणि पक्ष्यांमधील एन्फ्लुएंझाच्या विषाणूची जनुकीय अदलाबदल झाली होती.
मानवामध्ये H5N1 विषाणूचे संक्रमण झाल्याची एकही घटना आंतरराष्ट्रीय स्तरावर घडलेली नाही. मात्र, हवामान बदल व कोव्हिड-19 साथरोगामुळे विविध प्रजाती व भौगोलिक वैविध्य असलेल्या भागात विषाणूचा झालेला फैलाव पाहता साथरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘वन हेल्थ’ दृष्टिकोनाची गरज अधोरेखित होते. वर्ल्ड हेल्थ असेम्ब्लीने 2025 च्या मे महिन्यात ऐतिहासिक साथरोग कराराला मंजुरी दिली. त्यामध्ये ‘वन हेल्थ’चा समावेश आहे; तसेच पूर्वीच्या आराखड्यांमध्ये प्राण्यांकडून मानवामध्ये होणाऱ्या संक्रमणाचा प्रभावीपणे विचार करण्यात आला नव्हता, अशी जाणीव त्यामध्ये दिसून येते. पॅथोजन ॲक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग (PABS) प्रक्रिया हा करार साथरोग पसरवण्याची क्षमता असलेल्या रोगजनकांच्या माहितीची देवाणघेवाण आणि रोगाशी सामना करण्यासाठी वैद्यकीय उपाययोजनांच्या विकासाशी संबंधित आहे. त्यावर अजूनही विचारविनिमय सुरू आहे. कराराच्या मसुद्यावर काम करणारा इंटरगव्हर्न्मेंटल वर्किंग ग्रुपची (IGWG) या महिन्यात पुन्हा बैठक होईल आणि ‘वन हेल्थ’ दृष्टिकोनाच्या प्रभावी अंमलबजावणीसह PABS च्या कार्यपद्धतीवर विचारविनिमय करील. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वय आणि राष्ट्रीय स्तरावर अंमलबजावणीचा समावेश आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य, पशुवैद्यकीय, कृषी, अन्न आणि पर्यावरण क्षेत्रांमध्ये देखरेख ठेवणे, अहवाल सादर करणे आणि डेटाची देवाणघेवाण होईल आणि कुक्कुटपालक शेतकऱ्यांसारख्या स्थानिक समुदाय व अति प्रमाणात धोका असलेल्या समुदायासंबंधात संवाद साधला जाईल.
पुढील काळात आरोग्यावर येणारे जागतिक संकट हे प्राण्यांकडून येणाऱ्या रोगांचे असल्याची दाट शक्यता आहे. सध्याच्या H5N1 साथीच्या व्यापक स्वरूपामुळे केवळ प्राण्यांच्या व मानवाच्या आरोग्यावरच परिणाम होतो, असे नाही, तर वैविध्यपूर्ण प्रजाती आणि प्राणीजन्य पदार्थांचा पुरवठाही धोक्यात आला आहे. सस्तन प्राण्यांमध्ये साथरोगाचा फैलाव (आणि मृत्यू) होत असल्याने या विषाणूकडे मानवासह अनेक प्रजातींमध्ये संक्रमण करण्याची क्षमता असल्याचे अधोरेखित होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशासकीय आराखड्यात नव्या जागतिक आरोग्य आव्हानांसाठी ‘वन हेल्थ’ दृष्टिकोन प्रभावीपणे कार्यान्वित करणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
लक्ष्मी रामकृष्णन या ऑब्झर्व्हर रीसर्च फाउंडेशनच्या ‘सेंटर फॉर न्यू इकनॉमिक डिप्लोमसी’मध्ये असोसिएट फेलो आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Lakshmy is an Associate Fellow with ORF’s Centre for New Economic Diplomacy. Her work focuses on the intersection of biotechnology, health, and international relations, with a ...
Read More +