विविध देशांच्या सरकारांकडून निधी मिळालेल्या AI प्रकल्पांमुळे जगभरातील रिअल-टाइम युद्धपद्धतींमध्ये बदल घडत आहेत आणि हे स्वयंचलित एजंट्सद्वारे नव्हे, तर डेटाचे विश्लेषण आणि त्याचे अर्थ लावण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करून.
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विविध शैक्षणिक आणि व्यावहारिक क्षेत्रांमध्ये वेगाने समाविष्ट होत असून, लष्करी कारवाया याला अपवाद नाहीत. जगभरातील राष्ट्रांनी संरक्षण नियोजन आणि धोरणात्मक अंमलबजावणीत AI चा समावेश करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामध्ये अमेरिका, इस्रायल आणि चीन आघाडीवर आहेत. मात्र, AI वास्तविक म्हणजेच रिअल-टाइम युद्धभूमीवर कसा प्रभाव टाकतो आणि त्याचा कार्यकारी प्रभाव कितपत आहे, याबाबत अनेकदा गैरसमज किंवा अतिशयोक्ती केली जाते. ड्रोनसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे स्वयंचलित घातक कारवाया घडवून आणणे ही AI ची मुख्य भूमिका नसून, समकालीन युद्धात AI चे प्रमुख कार्य म्हणजे प्रचंड प्रमाणातील डेटाची प्रक्रिया करून परिस्थितीजन्य जागरूकता वाढवणे आणि कमांडर्सना युद्धक्षेत्राचे अधिक सर्वसमावेशक आकलन करून देणे.
एप्रिल 2017 मध्ये अमेरिकेच्या संरक्षण विभागाने (डिपार्टमेंट ऑफडिफेन्स - DoD) स्थापन केलेल्या अल्गोरिदमिक वॉरफेअर क्रॉस-फंक्शनल टीमला सर्वसाधारणपणे प्रोजेक्ट मेव्हन म्हणून ओळखले जाते. संरक्षण कारवायांमध्ये AI आणि मशीन लर्निंग (ML) यांचे एकत्रीकरण अधिक प्रभावी करण्यासाठी या उपक्रमाची रचना करण्यात आली होती. अमेरिकेची धोरणात्मक आणि तांत्रिक आघाडी प्रतिस्पर्धी व आव्हानकर्त्यांवर कायम ठेवणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश होता. प्रारंभी गुगलच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या प्रकल्पाचा हेतू मध्यपूर्वेत कार्यरत असलेल्या अमेरिकच्या ड्रोनद्वारे निर्माण होणाऱ्या प्रचंड डेटावर प्रक्रिया करणाऱ्या प्रणाली विकसित करणे हा होता. या डेटावर AI मॉडेल्सचे प्रशिक्षण देऊन, ड्रोनद्वारे मिळालेल्या निरीक्षण फुटेजमधून लष्करी लक्ष्यांची स्वयंचलित ओळख पटवणे, आणि त्यानंतर ही माहिती मानवी पडताळणी व पुढील कारवाईसाठी कमांडिंग अधिकाऱ्यांकडे पाठवणे, हे प्रोजेक्ट मेव्हनचे उद्दिष्ट होते.
ड्रोनसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे स्वयंचलित घातक कारवाया घडवून आणणे ही AI ची मुख्य भूमिका नसून, समकालीन युद्धात AI चे प्रमुख कार्य म्हणजे प्रचंड प्रमाणातील डेटाची प्रक्रिया करून परिस्थितीजन्य जागरूकता वाढवणे आणि कमांडर्सना युद्धक्षेत्राचे अधिक सर्वसमावेशक आकलन करून देणे.
2018 मध्ये, AI च्या लष्करी उपयोगांमध्ये गुगल कंपनीच्या सहभागावरून कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अंतर्गत विरोध झाल्यानंतर, गुगलने संरक्षण विभागाशी (DoD) प्रोजेक्ट मेव्हन संदर्भातील सहकार्य नूतनीकरण (रिन्यू) न करण्याचा निर्णय घेतला. या माघारीमुळे प्रकल्पाच्या विकासाच्या प्रवासात तात्पुरती पोकळी निर्माण झाली आणि इतर नागरी संरक्षण-तंत्रज्ञान कंपन्यांनी अधिक सक्रिय भूमिका स्वीकारली. यापैकी पॅलनटीर टेक्नॉलॉजीस् (Palantir Technologies) ही कंपनी प्रमुख कंत्राटदार म्हणून पुढे आली. डेटा एकत्रीकरण आणि विश्लेषणातील आपल्या कौशल्याचा वापर करून तिने मेव्हनच्या कार्यकारी क्षमतांना चालना दिली आणि अमेरिकेच्या संरक्षण उद्दिष्टांसाठी प्रकल्पाचा सातत्यपूर्ण पाठिंबा सुनिश्चित केला.
प्रोजेक्ट मेव्हनने वेगाने कार्यकारी यश दाखवले आणि इराक व सीरियामधील इस्लामिक स्टेटविरोधातील अमेरिकन लष्करी गुप्तचर प्रयत्नांना महत्त्वपूर्ण मदत केली. फेब्रुवारी 2024 पर्यंत, या प्रणालीमुळे या प्रदेशांत 85 हून अधिक अचूक हवाई हल्ले सुलभ झाल्याचे नोंदवले गेले. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्युलर मूर यांच्या मते, या प्रणालीची भूमिका स्वायत्त हल्ल्यांऐवजी लक्ष्य ओळखणे आणि मूल्यमापनापुरतीच मर्यादित होती; प्रत्येक हल्ल्याचा निर्णय अंमलबजावणीपूर्वी मानवी पुष्टीवरच अवलंबून होता. सध्या हा प्रकल्प अमेरिकन नॅशनल जियोस्पेशियल-इंटेलिजेंस एजेंसी यांच्या नेतृत्वाखाली असून, तो लष्करी आणि धोरणात्मक वापरासाठी जागतिक स्तरावर नकाशांकनासाठी वापरला जात आहे.
प्रोजेक्ट मेव्हनचे अंतिम उद्दिष्ट बहुस्रोतांमधून मिळणाऱ्या गुप्तचर माहितीसाठी सातत्यपूर्ण विश्लेषण करणारी एक स्थायी प्रणाली उभारणे असे असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही प्रक्रिया सतत शिकणाऱ्या विश्लेषणात्मक इंजिन्सपासून बनलेल्या फेडरेटेड आर्किटेक्चरद्वारे चालवण्याची कल्पना आहे. या चौकटीची दीर्घकालीन महत्त्वाकांक्षा अशी आहे की भूमी, समुद्र, आकाश, सायबर आणि अवकाश या सर्व क्षेत्रांतील गुप्तचर माहिती एकत्रित व समन्वित करणारी, बहुआयामी लक्ष्यीकरण प्रणाली विकसित करणे, ज्यायोगे माहिती-आधारित, समकालीन लष्करी कारवाया करण्याची अमेरिकेची क्षमता अधिक बळकट होईल.
अनेक तज्ज्ञांनी रशियाचे युक्रेनवरील आक्रमण आणि त्यानंतरचा संघर्ष आधुनिक युद्धात AI च्या तैनातीसाठी एक “परीक्षण क्षेत्र” किंवा “थेट प्रयोगशाळा” म्हणून वर्णन केले आहे. या संघर्षामुळे शस्त्रप्रणाल्या, गुप्तचर विश्लेषण आणि सायबर सुरक्षेसाठी AI तंत्रज्ञानाच्या वापरात मोठ्या प्रमाणावर नवोन्मेषाला चालना मिळाली आहे, कारण रशियन आणि युक्रेनियन दोन्ही दल तांत्रिक आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या संदर्भात, अमेरिकेचा संरक्षण विभाग (DoD) अंतर्गत विकसित प्रोजेक्ट मेव्हनने निर्णायक प्रभाव टाकला असून, रशियन घुसखोरीच्या सुरुवातीपासूनच युक्रेनच्या संरक्षण प्रयत्नांना महत्त्वपूर्ण पाठबळ दिले आहे.
विशेषतः, अमेरिकन सेनेच्या XVIII एअरबोर्न कॉर्प्स सोबत एकत्रीकरणातून प्रोजेक्ट मेव्हनचे योगदान स्पष्टपणे दिसून आले. जनरल ख्रिस्तोफर डोनोह्यू यांच्या नेतृत्वाखालील या दलाने सिक्योरिटी असिस्टन्स ग्रुप–यूक्रेन (SAG-U) चे कमांड स्वीकारले. सुरुवातीला SAG-U ची भूमिका कमांड समर्थन, लॉजिस्टिक नियोजन आणि युक्रेनच्या आघाडीवर साहित्य पोहोचवणे इतकीच मर्यादित होती; मात्र लवकरच तिचे कार्य थेट युद्धभूमीवरील सहाय्याकडे विशेषतः लक्ष्यनिर्धारणाच्या कामांकडे वळले.
केवळ लक्ष्य ओळखण्यापुरते मर्यादित न राहता, ही मॉडेल्स युद्धभूमीवर निर्णय सहायता प्रणाली (डिसिजन सपोर्ट सिस्टीम) म्हणून कार्यरत होती. प्रत्यक्षात, त्यांनी युक्रेनियन कमांडर्सना एक गतिशील “डिजिटल युद्धभूमी मॉडेल” उपलब्ध करून दिले.
प्रोजेक्ट मेव्हन अंतर्गत विकसित केलेल्या AI मॉडेल्सनी संभाव्य लक्ष्यांची ओळख पटवून ती माहिती पुढे पाठवण्याचे काम केले आणि युक्रेनच्या दलांनी केलेल्या अनेक प्रतिहल्ल्यांमध्ये त्यांची निर्णायक भूमिका राहिली. केवळ लक्ष्य ओळखण्यापुरते मर्यादित न राहता, ही मॉडेल्स युद्धभूमीवर निर्णय सहायता प्रणाली (डिसिजन सपोर्ट सिस्टीम) म्हणून कार्यरत होती. प्रत्यक्षात, त्यांनी युक्रेनियन कमांडर्सना एक गतिशील “डिजिटल युद्धभूमी मॉडेल” उपलब्ध करून दिले. या आभासी प्रतिमेमुळे तुलनेने मर्यादित सेन्सर नेटवर्कमधून गोळा केलेल्या डेटाचे संकलन करून शत्रूच्या दलांची हालचाल आणि त्यांची ठिकाणे शोधणे व मागोवा घेणे शक्य झाले. सेन्सर तैनातीवरील मर्यादा असूनही, यामुळे परिस्थितीजन्य जागरूकता आणि कार्यकारी निर्णयक्षमता लक्षणीयरीत्या वाढली. नंतर नॅशनल जियोस्पेशियल-इंटेलिजेंस एजेंसीने सार्वजनिक नोंदींत उघड केले की युक्रेनमध्ये प्रोजेक्ट मेव्हनचा वापर करून ‘फाइंड, फिक्स, फिनिश’ चक्र म्हणजेच लक्ष्य ओळखून ते नष्ट करण्याचा कालावधी 10 मिनिटांपेक्षा कमी वेळेत पूर्ण करता येऊ लागला.
प्रोजेक्ट मेव्हनमुळे रशियन संरक्षण दलांचे प्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे प्रमुख लष्करी सल्लागार जनरल व्हॅलरी गेरासिमोव यांना अचूक लक्ष करण्यातही महत्त्वाची मदत झाल्याचे व्यापकपणे मानले जाते. 1 मे 2022 रोजी ते रशियन लष्कराच्या मुख्यालयाला भेट देत असताना, त्या ठिकाणी युक्रेनियन तोफखाना हल्ला झाला. या हल्ल्यात अमेरिकेने पुरवलेली हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टम (HIMARS) वापरण्यात आल्याचे वृत्त आहे. अशाच प्रकारचे लक्ष्यीकरण सहाय्य प्रोजेक्ट मेव्हन कडून रशियन सैनिकांच्या तळांवरील युक्रेनियन हल्ल्यांनाही मिळाले असण्याची शक्यता आहे, विशेषतः मारियिवका (Mariivka) येथील तळावर, जिथे रशियन सैनिकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकलेल्या प्रतिमांमधून माहिती गोळा करण्यात आली असावी, असा अंदाज आहे. याशिवाय, रशियन तेल शुद्धीकरण केंद्रांवर सुरू असलेल्या युक्रेनियन आक्रमक कारवायांनाही प्रोजेक्ट मेव्हनच्या AI -सहाय्यित लक्ष्यीकरण क्षमतांमुळे कार्यकारी लाभ मिळाल्याचे दिसते. अशा मोहिमांसाठी वापरले जाणारे ड्रोन साध्या AI मॉडेल्सवर आधारित असतात, जे अचूक लक्ष्यीकरण सुलभ करतात आणि जॅमिंग प्रयत्नांना निष्प्रभ करण्यास मदत करतात.
AI मुळे पूर्णतः स्वयंचलित घातक प्रणाली शक्य होतील, असे सार्वजनिक व माध्यमांचे अनुमान असले, तरी प्रत्यक्ष कार्यकारी वास्तव हे दाखवते की युद्धभूमीवरील निर्णयप्रक्रियेत AI हे फोर्स मल्टिप्लायर म्हणून अधिक प्रभावी ठरते.
समकालीन युद्धात AI ची प्रत्यक्ष भूमिका प्रोजेक्ट मेव्हन सारख्या उपक्रमांतून स्पष्ट झाली आहे. नेहमीप्रमाणे AI ची भूमिका स्वयंचलितरीत्या घातक कारवाया करण्यापेक्षा प्रचंड आणि विविध स्वरूपातील माहितीचे विश्लेषण करणे व अर्थ लावणे यावर केंद्रित आहे. AI मुळे पूर्णतः स्वयंचलित घातक प्रणाली शक्य होतील, असे सार्वजनिक व माध्यमांचे अनुमान असले, तरी प्रत्यक्ष कार्यकारी वास्तव हे दाखवते की युद्धभूमीवरील निर्णयप्रक्रियेत AI हे फोर्स मल्टिप्लायर म्हणून अधिक प्रभावी ठरते.
लष्करी संदर्भात AI चे एक मूलभूत योगदान म्हणजे आधुनिक सेन्सर नेटवर्क्स, ड्रोनद्वारे टेहळणी, सायबर गुप्तचर आणि इतर स्रोतांमधून निर्माण होणाऱ्या प्रचंड डेटावर प्रक्रिया, संकलन आणि विश्लेषण करण्याची त्याची क्षमता. थेट लढाऊ कारवाया सुरू करण्याऐवजी, AI मॉडेल्स निर्णय-सहाय्य प्रणालींना आधार देतात, ज्यामुळे मानवी कमांडर्सची परिस्थितीजन्य जागरूकता वाढते, धोके ओळखणे सुलभ होते आणि लक्ष्यांना प्राधान्य देणे अधिक अचूक होते. प्रोजेक्ट मेव्हन हाच दृष्टिकोन दाखवतो. यामध्ये ड्रोन फुटेज आणि इतर गुप्तचर स्रोतांमधून संभाव्य लक्ष्य ओळखण्यासाठी आणि ती माहिती पुढे पाठवण्यासाठी AI आणि मशीन लर्निंगचा वापर केला जातो. AI स्वतःहून लक्ष्यांवर हल्ला करत नाही; त्याऐवजी पडताळलेली माहिती सादर केली जाते, ज्याचे विश्लेषण मानवी ऑपरेटर करून सुज्ञ निर्णय घेतात. ही ह्युमन-इन-द-लूप पद्धत लष्करी कारवायांमध्ये आदेशाची जबाबदारी आणि नैतिक देखरेख टिकवण्यासाठी अत्यावश्यक आहे.
स्वयंचलित शस्त्रप्रणाली महत्त्वाचे नैतिक आणि कायदेशीर प्रश्न उपस्थित करतात; तथापि, प्रोजेक्ट मेव्हन आणि तत्सम संरक्षण उपक्रमांतील सध्याचे AI उपयोग लक्ष्यीकरणाच्या चक्रात मानवी देखरेख सुनिश्चित करून आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगत राहतात. यामुळे पूर्णतः स्वयंचलित घातक कारवायांमुळे उद्भवू शकणाऱ्या अनपेक्षित संघर्षवाढीचा किंवा अनुषंगिक हानीचा धोका कमी होतो आणि लष्करी कारवायांमध्ये AI तंत्रज्ञानाचा सावध व संतुलित स्वीकार प्रतिबिंबित होतो.
मुळात, आधुनिक युद्धात AI चा परिवर्तनकारी प्रभाव मानवी निर्णयक्षमता बदलण्यात नसून, ती अधिक सक्षम करण्यात आहे. युद्धभूमीवरील माहितीचा वेग, अचूकता आणि आकलन वाढवून निर्णयकर्त्यांना बळ देणे, हेच AI चे खरे सामर्थ्य आहे.
मुळात, आधुनिक युद्धात AI चा परिवर्तनकारी प्रभाव मानवी निर्णयक्षमता बदलण्यात नसून, ती अधिक सक्षम करण्यात आहे. युद्धभूमीवरील माहितीचा वेग, अचूकता आणि आकलन वाढवून निर्णयकर्त्यांना बळ देणे, हेच AI चे खरे सामर्थ्य आहे. प्रोजेक्ट मेव्हनचे पहिले संचालक जॅक शॅनाहन यांच्या शब्दांत सांगायचे तर, “ही जुनी किंवा पारंपरिक शस्त्रप्रणाली आणि व्यावसायिक तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचे एक विचित्र मिश्रण आहे. या तंत्रज्ञानांच्या संयोगाचा नव्या, वेगळ्या आणि सर्जनशील पद्धतीने वापर कोण करू शकतो, त्यालाच खरा फायदा मिळतो.”
यातून युद्धाचे बदलते स्वरूप अधोरेखित होते, जिथे प्रगत विश्लेषण आणि AI यांच्या बळावर मिळणारे माहितीवरील वर्चस्व हे एक निर्णायक धोरणात्मक लाभ ठरते. त्यामुळे AI ची भूमिका मूलतः स्वयंचलित घातक कारवायांमध्ये नसून, माहितीचे विश्लेषण आणि निर्णय-सहाय्य यामध्येच केंद्रित आहे.
प्रणय जैनेंद्रन हे ORF च्या सेंटर फॉर सिक्युरिटी, स्ट्रॅटेजी अँड टेक्नॉलॉजीमधील रिसर्च असिस्टंट आहेत.
The views expressed above belong to the author(s). ORF research and analyses now available on Telegram! Click here to access our curated content — blogs, longforms and interviews.
Pranoy Jainendran is a Research Assistant with ORF’s Centre for Security, Strategy & Technology. His work examines how technology shapes State institutions, national and international affairs, ...
Read More +